Kangana Ranaut : बिग बींसोबत स्वत:ची तुलना, निवडणूक प्रचारादरम्यान कंगना म्हणाली, 'अमिताभ यांच्यानंतर इंडस्ट्रीत मलाच सन्मान'
Kangana Ranaut : कंगना रणौत हीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली आहे. तिच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
![Kangana Ranaut : बिग बींसोबत स्वत:ची तुलना, निवडणूक प्रचारादरम्यान कंगना म्हणाली, 'अमिताभ यांच्यानंतर इंडस्ट्रीत मलाच सन्मान' Kangana Ranaut Viral Speech Video from Election Campaign Compared herself with Amitabh Bachchan Lok Sabha 2024 Entertainment Bollywood Latest update detail marathi news Kangana Ranaut : बिग बींसोबत स्वत:ची तुलना, निवडणूक प्रचारादरम्यान कंगना म्हणाली, 'अमिताभ यांच्यानंतर इंडस्ट्रीत मलाच सन्मान'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/23897cca9af9f19b060dbd955d55ddf31714962666812720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut : जेव्हापासून कंगना रणौत (Kangana Ranaut) ही राजकारणाच्या मैदानात उतरली आहे, तेव्हापासून ती बरीच चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना तिचा जोरदार प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच तिची भाषणंही जोरदार व्हायरल होत असल्याचं चित्र आहे. नुकतच कंगनाने तिच्या भाषणातून चुकून तिच्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली. त्यातच आता तिने स्वत:ची तुलना ही बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही तिला चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय. तिच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान तिच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नेटकरी तिच्यावर बरसल्याचं चित्र आहे. कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे कंगना सध्या तिच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. पण या सगळ्यात तिच्या भाषणामुळे बरंच ट्रोलिंगला समोरं जावं लागतंय.
कंगनाने काय म्हटलं?
कंगनाच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कंगनाने म्हटलं की, 'मी राजस्थानात गेले काय, पश्चिम बंगाल असो, दिल्ली असो किंवा मणिपूर, कंगनाला खूप प्रेम मिळतं, हे पाहून लोकंही हैराण झालेत. मी दाव्यासह हे सांगू शकते की, इतकं प्रेम आणि सन्मान या इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यानंतर मलाच मिळत आहे.'
“Wherever I go, I get so much love, honestly, I'm like the Amitabh Bachchan of the cinema , but even bigger”
— Amock (@y0geshtweets) May 5, 2024
~ Drama Queen 😂
Even BJP supporters will choose Vikramaditya after repeatedly hearing her nonsense📌#LokSabhaElection2024 #KanganaRanaut pic.twitter.com/seQc5Hg0Sr
कंगनाकडून तिच्याच पक्षाच्या नेत्यावर टीका
कंगना मंडीमधील सरकाघाट विधानसभा मतदारसंघात प्रचार करत होती. त्यावेळी तिने तिच्या भाषणात तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. पण तिने यावेळी नाव मात्र तिच्या पक्षातील नेत्याचं घेतलं. कंगनाने चुकून तेजस्वी यादव ऐवजी तेजस्वी सुर्या असा उल्लेख केला. दरम्यान तेजस्वी सूर्या मासे खात असल्याचा उल्लेख कंगनाने केला आहे. तेजस्वी सूर्या हे भाजपचे नेते असून ते कर्नाटकमधून लोकसभेचे खासदार आहेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)