एक्स्प्लोर

October 2023 Release : ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 14 सिनेमे होणार प्रदर्शित

Bollywood : ऑक्टोबर महिन्यात 14 सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

October 2023 Bollywood Movie Release : ऑक्टोबर (October) महिना सिनेप्रेमींसाठी खूपच खास आहे. या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 14 बहुचर्चित सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. यात कंगना रनौतच्या 'तेजस' या सिनेमापासून ते टायगर श्रॉफ पर्यंतच्या 'गणपत'पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

दोनों (Dono)

राजश्री प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेला 'दोनों' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सनी देओल आणि राजवीर देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सूरज बडजात्याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 5 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

मिशन रानीगंज (Mission Raniganj)

'मिशन रानीगंज' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. टीनू सुरेश यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मिशन रानीगंज' या सिनेमात परिणीती चोप्रा आणि खिलाडी कुमार मुख्य भूमिकेत आहेत. 6 ऑक्टोबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

थँक्यू फॉर कमिंग (Thank You For Coming)

'थँक्यू फॉर कमिंग' या आगामी सिनेमात प्रेम, मैत्री अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भूमी पेडणेकर, कुशा कपिला, डॉली सिंह, शिबानी बेदी, प्रधुम्न सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अनिल कपूरदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

यात्रीस (Yaatris)

'यात्रीस' हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रघुबीर यादव, सीमा पाहवा आणि अनुराग मल्हान, जेमी लीवर मुख्य भूमिकेत आहेत. 6 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

डरन छू 

'डरन छू' हा सिनेमा 13 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात करण पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

गुठली लड्डू 

संजय मिश्राच्या आगामी 'गुठली लड्डू' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 13 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

लियो 

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा 'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. लोकेश कनगराज यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात विजयसह तृषा, संजय दत्त, प्रिया आनंद, सैंडी, गौतम वासुदेव मेनन, मंसूर अली खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

घोस्ट (Ghost)

'घोस्ट' या दाक्षिणात्य सिनेमाचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टायगर नागेश्वर राव (Tiger Nageswara Rao)

'टायगर नागेश्वर राव' या सिनेमात रवी तेजा मुख्य भूमिकेत आहे. 70 च्या दशकातील घडामोडींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अनुपम खेर, मुरली शर्मा, गायत्री भारद्वाज मुख्य भूमिकेत आहेत. 

तेजस (Tejas)

'तेजस' या सिनेमात कंगना रनौत वैमानिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्वेश मेवाडाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 20 ऑक्टोबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

यारियां 2 (Yaariyaan 2)

खोसला कुमार दिग्दर्शित 'यारियां 2' हा सिनेमा 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 

गणपत (Ganapath)

'गणपत' या सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. विकास बहल यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.

आंख मिचोली (Aankh Micholi)

मृणाल ठाकूर, अभिमन्यू, परेश रावल, शरमन जोशी, दिव्या दत्ता अभिनीत 'आंख मिचोली' हा सिनेमा 27 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

12 वीं फेल 

'12 वीं फेल' हा सिनेमा 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget