एक्स्प्लोर
हृतिक रोशनला अटक करा, कंगनाची मागणी
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशनमधील वाद शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. कंगना राणावतच्या वकिलांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून हृतिकला अटक करण्याची मागणी केली आहे.
कंगनाला बदनाम करण्यासाठी तिने हृतिकला पाठवलेले खाजगी मेल आणि फोटो जगजाहीर केल्याचा आरोप त्या पत्रात करण्यात आला आहे.
हृतिक-कंगनाच्या भांडणात नवा ट्विस्ट
तसंच हृतिक कंगनाला धमकावत असल्याचा आरोपही कंगनाच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन हृतिक रोशनवर कारवाई करावी अशी कंगनाची मागणी आहे.कंगना केस जिंकल्यास हृतिकला 10 वर्षांचा तुरुंगवास?
कंगनाच्या वकिलांच्या पत्रातील मुद्दे कंगनाला बदनाम करण्यासाठी तिने पाठवलेले खासगी मेल आणि फोटो हृतिकने जगजाहीर केले. त्यापूर्वी हृतिकने कंगनाला नोटीस पाठवून तशी धमकीही दिली होती. कंगनावर दडपण आणण्यासाठी हृतिक ते कृत्य करत आहे. कृपया आपण याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. फौजदारी संहितेच्या कलम 151 नुसार हृतिकला अटक होणं गरजेचं आहे. संबंधित बातम्याकंगना, पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी माग: ह्रतिक रोशन
‘मी एकवेळ पोपशी अफेअर करेन..’ ट्वीटमुळे हृतिकला नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement