Kangana Ranaut: 'तुझी बाजू ऐकायची होती'; नवाजुद्दीनच्या पोस्टला कंगनाचा रिप्लाय
गेल्या काही दिवसांपासून आलिया ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाजुद्दीवर (Nawazuddin Siddiqui) आरोप करत आहे. अखेर या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्वीट शेअर करत मौन सोडलं आहे.
![Kangana Ranaut: 'तुझी बाजू ऐकायची होती'; नवाजुद्दीनच्या पोस्टला कंगनाचा रिप्लाय kangana ranaut reacted on nawazuddin siddiqui statement on social media about wife aaliya siddiqui allegations Kangana Ranaut: 'तुझी बाजू ऐकायची होती'; नवाजुद्दीनच्या पोस्टला कंगनाचा रिप्लाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/07/2009a147287622c8b6d30c37d2a3cc551678165095637259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आलिया सिद्दीकीनं (Aaliya Siddhiqui) नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आलिया ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाजुद्दीनवर आरोप करत आहे. अखेर या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्वीट शेअर करत मौन सोडलं आहे. नवाजुद्दीननं ट्वीट माध्यमातून त्याची बाजू मांडली. आता नवाजुद्दीनच्या ट्वीटवर कंगनानं प्रतिक्रिया दिली आहे.
नवाजुद्दीनचं ट्वीट
नवाजुद्दीननं ट्वीटमध्ये लिहिलं, "मी आरोपांवर काही बोलत नसल्याने वाईट झालो आहे. पण या सगळ्या गोष्टींचा माझ्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे. आता हा तमाशा थांबवण्यासाठी मी मौन सोडत आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओंनी माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. काही मंडळी या गोष्टीची खूप आनंद घेत आहेत." नवाजुद्दीन या ट्वीटवर आता कंगनानं रिअॅक्शन दिली आहे,
काय म्हणाली कंगना?
कंगनानं नवाजुद्दीनच्या ट्वीटला रिप्लाय करत लिहिलं, 'मौन हे तुम्हाला शांती देत नाही. नवाजुद्दीन साहेब, तुमचे चाहते आणि हितचिंतक यांना तुमची बाजू ऐकायची होती. ' कंगनाच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
Silence doesn’t always give us peace, @Nawazuddin_S saab, there are many fans and well wishers of yours who care to know your side of the story 🙏 https://t.co/yEwuHXmHCH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 6, 2023
नवाजुद्दीननं ट्वीटमध्ये लिहिलं,"माझ्या मुलांना मी आलिशान गाड्या दिल्या होत्या. पण आलियाने त्या गाड्या विकल्या आणि ते पैसे स्वत:साठी खर्च केले. मुलांसाठी मुंबईतील वर्सोवा येथील एका अपार्टमेंटमध्ये मी घर घेतलं होतं. पण आलियाने ते घर विकलं आणि दुसऱ्या एका घरात ती मुलांसोबत भाड्याने राहत आहे. आलियाला फक्त पैशांची गरज आहे आणि पैशांसाठी तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत".
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. आलिया ही गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नवाजुद्दीनवर आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी आलियानं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती, "नवाजुद्दीन माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आता मुलांचा ताबा हवा आहे. पण मला आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे"
नवाजुद्दीनचे चित्रपट
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीन हा लवकरच 'हड्डी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)