'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमे बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये स्पर्धा, 50 ते 60 टायटल्ससाठी निर्मात्यांनी केलं रजिस्ट्रेशन
operation sindoor movie title : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमे बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये स्पर्धा, 50 ते 60 टायटल्ससाठी निर्मात्यांनी केलं रजिस्ट्रेशन

operation sindoor movie title : जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली आहे. याची परिणिता आता युद्धात झाली आहे. दरम्यान, भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला (operation sindoor) पडद्यावर दाखवण्यासाठी बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्पर्धा निर्माण झाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'शी निगडीत टायटल मिळवण्यासाठी बॉलिवूडमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अभिनेता जॉन अब्राहिम, सुनील शेट्टी आणि आदित्य धर यांच्यासारख्या निर्मात्यांनी यावर सिनेमा बनवण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘मिशन सिंदूर’ और ‘सिंदूर : द रेवेंज’, अशी नाव रजिस्ट्रेशन करण्यात आली आहेत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवारी ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. दरम्यान, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA), इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स कौन्सिल (IFTPC) आणि वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन (WIFPA) यांना 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित चित्रपटांच्या शीर्षकांच्या नोंदणीसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत.
आयएमपीपीएचे सचिव अनिल नागरथ म्हणाले,'आम्हाला 30 हून अधिक टाटायल्ससाठी अर्ज मिळाले आहेत. ही संख्या 50-60 पर्यंत पोहोचू शकते. बहुतेक लोक 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'मिशन सिंदूर' या नावासाठी अर्ज करत आहेत. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त टाटायल्ससाठी अर्ज करू शकते, परंतु जो प्रथम अर्ज करतो त्याला टायटल मिळते.
दिग्दर्शक आणि सिनेनिर्मात्यांनी ऑपरेशन सिंदूरवर सिनेमा बनवण्यासाठी योजना आखली आहे. सध्या ऑपरेशन सिंदूर भारतासाठी गर्वाचा विषय आहे. कारगील, उरी, कुंभ आणि अन्य काही सिनेमांच्या टायटल्ससाठी अर्ज प्राप्त झाल्याचेही नागरथ यांनी सांगितलं आहे. सध्या ज्या शीर्षकांसाठी अर्ज मागवले जात आहेत त्यात 'हिंदुस्तान का सिंदूर', 'मिशन ऑपरेशन सिंदूर' आणि 'सिंदूर का बदला' यांचा समावेश आहे. पहलगामच्या नावाने 'पहलगाम: द टेरर अटॅक', 'पहलगाम अटॅक' आणि इतर टायटल्ससाठीही अर्ज प्राप्त झाले आहेत. 2016 मध्ये उरी येथे हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावरीही 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा सिनेमा बनवण्यात आला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या























