Kangana Ranaut: "पुरुष आणि स्त्री रस्त्यावर..."; मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोबद्दल कंगनानं स्पष्टच सांगितलं!
Kangana Ranaut: कंगना तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चर्चेत आहे. या फोटोंमध्ये कंगनासोबत एक मिस्ट्री मॅन देखील दिसला.
Kangana Ranaut On Dating Rumors: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वक्तव्यांमुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध विषयांवरील मतं मांडत असते. सध्या कंगना तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चर्चेत आहे. या फोटोंमध्ये कंगनासोबत एक मिस्ट्री मॅन देखील दिसला. कंगना या मिस्ट्री मॅनला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अशातच आता कंगनानं या मिस्ट्री मॅनबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
कंगनानं मिस्ट्री मॅनबद्दल शेअर केली पोस्ट
कंगनानं इन्स्टाग्रामवर एका मिस्ट्री मॅनसोबतचे फोटो शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, या मिस्ट्री मॅनबद्दल विचारण्यासाठी मला अनेक कॉल्स आणि मेसेज येत आहेत. मी त्याच्यासोबत अनेक वेळा सलूनच्या बाहेर हँग आउट करत असते. चित्रपट/बॉली मीडिया बऱ्याच कल्पना करत आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावर एकत्र चालू शकतात, त्यामुळे केवळ सेक्शुअल कारणांपेक्षा यामागे काही वेगळी कारणे असू शकतात. ते पुरुष आणि स्त्री सहकारी असू शकतात, भावंडे असू शकतात, मित्र असू शकतात किंवा तो एक हेअर स्टायलिस्ट असू शकतो."
कंगनाचे तिच्या मिस्ट्री मॅनसोबतचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक अंदाज लावत होते की, कंगना लवकरच लग्न करणार आहे. पण कंगना आणि मिस्ट्री मॅनच्या डेटिंगच्या चर्चेवर आता कंगनानं पोस्ट शेअर करुन पूर्णविराम लावला आहे.
कंगनाचा आगामी चित्रपट
कंगनाचा तेजस हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तसेच तिचा चंद्रमुखी 2 हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता कंगना 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. इमर्जन्सी या चित्रपटात कंगनासोबतच अनुपम खैर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: