Kangana Ranaut : मध्यरात्री मिस्ट्री मॅनसोबत दिसली ड्रामाक्वीन; कायम भडकून असणारी कंगना कॅमेरा दिसताच चक्क लाजली!
Kangana Ranaut with mystery man :मिस्ट्री मॅनसोबत अभिनेत्री कंगनाचे हे फोटो पाहून लोक या फिल्म स्टारच्या लिंकअपबद्दल अंदाज बांधताना दिसत आहेत.
Kangana Ranaut with mystery man : बॉलीवूड ड्रामाक्वीन कंगना राणौत मुंबईतील सलूनमधून बाहेर पडताना दिसली. यावेळी अभिनेत्री एका मिस्ट्री मॅनसोबत (Kangana Ranaut with mystery man) होती. यावेळी कंगनने अतिशय सुंदर स्काय ब्लू कलरचा स्कर्ट तसेच गाॅगल घातला होता. तिच्यासोबत दिसणारा रहस्यमय माणूस हा परदेशी होता. दोघेही एकमेकांचे हात घट्ट पकडून सलूनच्या बाहेर आले. त्यानंतर हे फोटो वणव्यासारखे व्हायरल झाले. मिस्ट्री मॅनसोबत अभिनेत्री कंगनाचे हे फोटो पाहून लोक या फिल्म स्टारच्या लिंकअपबद्दल अंदाज बांधताना दिसत आहेत.
कंगना मिस्ट्री मॅनसोबत सलूनमधून बाहेर पडताना दिसल्यानंतर लिंकअपच्या बातम्या तीव्र झाल्या. यावेळी या मिस्ट्री मॅनने अभिनेत्री कंगना राणौतचा हात घट्ट पकडला होता. दोघेही चाहत्यांना कपल वाइब्स देताना दिसले. हे फोटो पाहिल्यानंतर सर्वजण अंदाज लावत आहेत की अभिनेत्री कंगना रणौत परदेशी पुरुषाच्या प्रेमात पडली आहे. चित्रपट स्टार कंगना राणौत या मिस्ट्री मॅनसोबत जोडी करताना एकदम परफेक्ट दिसत होती. दोघांचे हे फोटो येताच व्हायरल होऊ लागले.
यावेळी पापाराझी पाहून अभिनेत्री कंगना राणौतला लाज वाटू लागली. अभिनेत्रीचे हे फोटोज वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. अनेकदा मीडिया कर्मचार्यांशी मोकळेपणाने बोलणारी अभिनेत्री कंगना रणौत यावेळी पापाराझींना टाळताना दिसली. अभिनेत्री कंगना राणौतचे हे फोटो पाहून तिचे चाहते यावेळी खूप खूश आहेत. या फोटोंवर कमेंट करताना लोकांनी लिहिले, 'राणीला राजा मिळाला आहे.'
View this post on Instagram
कंगनाचे तिच्या मिस्ट्री मॅनसोबतचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक अंदाज लावत आहेत की ही अभिनेत्री लवकरच लग्न करू शकते. अभिनेत्री कंगना राणौतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. लोक या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या