![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कंगना रनौत हिने पॉप स्टार रिहानाचं केलं होतं कौतुक; ट्वीट व्हायरल
पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) भडकली आहे. दरम्यान, रिहानाचं (Rihanna) कौतुक करणारा कंगना रनौतचा जुना ट्वीट व्हायरल झाला आहे.
![कंगना रनौत हिने पॉप स्टार रिहानाचं केलं होतं कौतुक; ट्वीट व्हायरल kangana ranaut old tweet viral requesting to listen rihannas famous song in Rihanna comments farmer protest controversy कंगना रनौत हिने पॉप स्टार रिहानाचं केलं होतं कौतुक; ट्वीट व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/03225605/kangna-rihana.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut Vs Rihanna : राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला आता देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ ग्रेटा थनबर्ग आणि गायिका रिहाना यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत भडकली आहे. तिने त्वरित ट्विटरवर रिहानाला उत्तर दिलंय. कंगनाने रिहानाला मूर्ख संबोधून या विषयावर शांत राहण्याची सूचना केलीय.
दरम्यान, आता कंगनाचे एक जुने ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये ती रिहानाचे प्रसिद्ध गाणे 'डायमंड्स' ऐकण्याची इच्छा व्यक्त करत आहे. हे ट्वीट कंगनाच्या ट्विटर अकाउंटवरून मे 2019 च्या महिन्यात केले गेले होते.
पॉप स्टार रिहाना काय म्हणाली? कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे."
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
कंगनाचा रिहानावर पलटवार कंगनाने ट्वीट केले की, "या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.''
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)