(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : जावेद अख्तर मानहानी प्रकरण, कंगना रनौतला न्यायालयाचा झटका
Kangana Ranaut : कंगना रनौत विरोधात मानहानीचा खटला लढणाऱ्या गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या विरोधात कंगनानेही तक्रार दाखल केली होती.
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. शनिवारी न्यायलयाने कंगनाची याचिका फेटाळली आहे. या याचिकेत कंगनाने गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर खंडणी प्रकरणाची सुनावणी दंडाधिकारी न्यायालयाकडून दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावी. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला. यानंतर कंगनानेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर खंडणी आणि गुंडगिरीचे आरोप लावले आहेत. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयावर विश्वास नाही असे म्हणत कंगनाने प्रकरण दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करण्याची मागणी केली होती. कंगनाने याचिकेत दावा केला होता की 'मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तिला "अप्रत्यक्षपणे" धमकी दिली होती की जर ती जामीनपात्र गुन्ह्यात न्यायालयासमोर गैरहजर राहिली तर कंगनाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल.'
ऑक्टोबरमध्ये मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करण्याचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने म्हटले की, 'कंगना विरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना, न्यायालय निष्पक्षपणे वागले आणि अभिनेत्रीशी कोणताही भेदभाव केला नाही.' अख्तर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अंधेरी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी दावा केला होता की कंगनाने एका मुलाखतीदरम्यान आपल्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Golden Temple : सुवर्ण मंदिरातील धक्कादायक प्रकार, तरुणाकडून दरबार साहिब येथील नियमांचा भंग, जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
- PM Modi : पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा, 'गोवा मुक्ति दिन' कार्यक्रमाला लावणार हजेरी, 650 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन
- Badminton World Championships : किदम्बी श्रीकांत ठरला जागतिक बॅडमिंटनची फायनल गाठणारा पहिला भारतीय पुरुष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha