Golden Temple : सुवर्ण मंदिरातील धक्कादायक प्रकार, तरुणाकडून दरबार साहिब येथील नियमांचा भंग, जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
Golden Temple News : पंजाबमधील सुवर्ण मंदिरात धक्कादायक प्रकार घडला आहे. रेलिंग ओलांडून धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करणाऱ्या एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Golden Temple News : पंजाबमधील (Punjab) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) धक्कादायक प्रकार घडला आहे. रेलिंग ओलांडून धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन करणाऱ्या एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
या तरुणाने रेलिंगवरून उडी मारुन गुरु ग्रंथ साहिब येथील पावित्र्य भंग करणारी कृती केल्यानंतर सुवर्ण मंदिरातील उपस्थितांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
आरोपीने रेलिंग ओलांडून ग्रंथापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पवित्र ग्रंथापर्यंत पोहोचू शकला नाही. या घटनेनंतर, एसजीपीसी (SPGC) सेवकांनी तरुणाला पकडले, त्यानंतर एसजीपीसी कार्यालयात नेत असताना संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिस उपायुक्त पीएस भंडल यांनी सांगितले की, ''उत्तर प्रदेशातील राहणारा हा व्यक्ती सुमारे 30 वर्षांचा असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तो सुवर्णमंदिरात कधी गेला आणि त्याच्यासोबत किती लोक होते याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.''
या घटनेनंतर, मोठ्या संख्येने शीख यात्रेकरू आणि विविध शीख संघटनांनी एसजीपीसीच्या हलगर्जीपणाबद्दल टीका केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तेजा सिंग समुद्री हॉल येथील एसजीपीसी परिसराभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus : मुंबईत शनिवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद, डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा कामगिरी
- Badminton World Championships : किदम्बी श्रीकांत ठरला जागतिक बॅडमिंटनची फायनल गाठणारा पहिला भारतीय पुरुष
- Solapur : पोलीस अधीक्षक, न्यायाधीशांच्या नावे फेक अकाऊंट काढून पैशाची मागणी, आरोपी गजाआड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha