Kangana Ranaut : धाकड फ्लॉप झाल्यावर कंगना म्हणाली, 'अजून वर्ष संपलं नाही...'
कंगनानं (Kangana Ranaut) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) नुकताच प्रदर्शित झालेला 'धाकड' हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. त्यामुळे अनेक लोक कंगनाना ट्रोल करत होते. आता कंगनानं तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
कंगना म्हणाली 'अजून वर्ष संपले नाही'
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये 'भारत की बॉक्स ऑफिस क्वीन' असं लिहिलेले एक आर्टिकल शेअर केले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिले, '2019 मध्ये मी मणिकर्णिका हा 160 कोटींचा सुपरहिट चित्रपट दिला, 2020 हे कोविडचे वर्ष होते. 2021 मध्ये, मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट 'थलायवी' दिला जो OTT वर प्रदर्शित झाला आणि खूप यशस्वी झाला. कंगनाने पुढे लिहिले, 'मला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागला पण 2022 च्या ब्लॉकबस्टर 'लॉक अप'चे हॉस्टिंग केले. अजून वर्ष संपलेले नाही, त्यातून खूप आशा आहेत.'
कंगनाची पोस्ट :
कंगनाचे काही आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तिचा 'तेजस' हा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगनाने भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलटची भूमिका साकारली होती. याशिवाय कंगनाने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कंगनाने तिच्या 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता - द इनकार्नेशन' या चित्रपटांची घोषणा केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाचीही ती निर्मिती करत आहे.
हेही वाचा: