Kangana Ranaut: विवाहित बिझनेसमॅनशी नाव जोडलं गेल्यानंतर कंगना कडाडली; लव्ह लाइफबद्दल स्पष्टच सांगितलं!
Kangana Ranaut: अयोध्येतील सोहळ्यातील कंगनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामधील फोटोंमध्ये कंगना EaseMyTrip या कंपनीचे संस्थापक निशांत पिट्टी यांच्यासोबत दिसली.
Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यातील कंगनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामधील फोटोंमध्ये कंगना EaseMyTrip या कंपनीचे संस्थापक निशांत पिट्टी यांच्यासोबत दिसली. कंगना आणि निशांत पिट्टी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. या चर्चांवर आता कंगनानं मौन सोडलं असून अशा अफवा पसरवणाऱ्यांना कंगनानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
कंगनानं शेअर केली पोस्ट
कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या आणि बिझनेसमॅन निशांत पिट्टी यांच्या अफेअरची अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "मीडियाला माझी नम्र विनंती, कृपया चुकीची माहिती पसरवू नका, निशांत पिट्टी हा विवाहित आहे आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे. त्यामुळे योग्य वेळेची वाट पहा. प्लिज आम्हाला लाजवू नका, एकत्र फोटो क्लिक काढले म्हणून एका तरुण महिलेचं नाव दररोज नवीन पुरुषाशी जोडणे हे चांगले नाही. कृपया असे करू नका." आता कंगना नेमकं कोणाला डेट करत आहे? हे जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
याआधी देखील कंगनाचं नाव एका मिस्ट्री मॅनसोबत जोडण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली. त्यानंतर कंगनाच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अशताच या अफवांबाबत कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "या मिस्ट्री मॅनबद्दल विचारण्यासाठी मला अनेक कॉल्स आणि मेसेज येत आहेत. मी त्याच्यासोबत अनेक वेळा सलूनच्या बाहेर हँग आउट करत असते. एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावर एकत्र चालू शकतात, त्यामुळे केवळ सेक्शुअल कारणांपेक्षा यामागे काही वेगळी कारणे असू शकतात. ते पुरुष आणि स्त्री सहकारी असू शकतात, भावंडे असू शकतात, मित्र असू शकतात किंवा तो एक हेअर स्टायलिस्ट असू शकतो."
कंगना लकरच इमर्जन्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जून 2024 रोजी रिलीज होत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: