एक्स्प्लोर

Happy Birthday Rekha : Kangana Ranaut ने Rekha ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

कंगना रनौतने रेखाला 'गॉडमदर' म्हणत सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Rekha : बॉलीवूडमध्ये आपल्या खास अदाकारीने लोकप्रिय असलेली अभिनेत्री रेखा (Rekha) आज 67 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या खास दिवशी रेखाची फॅन आणि बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने (Kangana Ranaut) रेखाला खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने सोशल मीडियावर एक खास संदेश लिहिला आहे. त्यात कंगनाने रेखाला 'गॉडमदर' म्हटले आहे. 

कंगनाने खास संदेश लिहित रेखाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रेखा सोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर तिने कॅप्शन लिहिले आहे, "माझी गॉडमदर असणाऱ्या प्रिय रेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... शान आणि सौंदर्याची प्रतिकृती". कंगनाने शेअर केलेला हा फोटो विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाच्या रिसेप्शन मधला आहे. कंगना आणि रेखा फोटोत छान पोझ देताना दिसून येत आहेत. 

कंगनाला झाशीची राणी म्हणते रेखा
एकीकडे कंगना रेखाला तिची 'गॉडमदर' म्हणत आहे. तेच रेखा एका गौरव सोहळ्यात म्हणाली होती, जर रेखाला मुलगी असती तर ती कंगनासारखीच असती. त्याच गौरव सोहळ्यात कंगनाने रेखाला एक खास पारितोषिक देखील दिले होते. त्यासोबत कंगनाचे मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच रेखा कंगणाला खऱ्या आयुष्यातील झाशीची राणी म्हणाली होती. 

रेखा रात्री 3 वाजता गेली होती कंगनाच्या घरी 
कंगना एका नामांकित वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हणाली होती, रात्री 3 वाजता रेखा अवॉर्ड आणि फूलं घेऊन माझ्या घरी आली होती. 

रेखाने नेहा कक्कडला दिले होती खास भेट
इंडियन आयडॉलच्या शोच्या स्टेजवर हिंदी चित्रपट सृष्टीच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी या शोची जर्ज असलेल्या नेह कक्कडला तिच्या लग्नाचे खास गिफ्ट दिले. रेखा यांनी नेहाला शगुन म्हणून कांजीवरम साडी भेट दिली आणि सोबतच आशीर्वादही दिले. रेखांच्या या गिफ्टमुळे नेहा कक्कड भारावून गेल्याचं पहायला मिळालं.

रेखाचे अमिताभवर किती प्रेम आहे?
एका मुलाखतीत रेखा यांना विचारण्यात आलं होतं की त्यांच अमिताभवर किती प्रेम आहे? यावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या की, जगभरात जेवढं प्रेम आहे त्यापेक्षाही जास्त अमिताभवर प्रेम आहे. रेखा यांनी सांगितलं की, त्या आजपर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीला भेटल्या नाहीत की जो अमिताभ बच्चन यांना पसंत करत नाही. मग अशा वेळी मी अमिताभ बच्चन यांना नापसंत कशी करु शकते असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Embed widget