Kangana Ranaut : "मी माझे शब्द मागे घेते", भाजपने फटकारल्यानंतर कंगनानं मागितली माफी; कृषी कायद्यांसंदर्भातील वक्तव्य घेतलं मागे
Kangana Ranaut Statement on Agricultural Law : केंद्र सरकारने रद्द केलेले तिन्ही कृषी कायदे पुन्हा लागू करावेल, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं होतं.
Kangana Ranaut on Farm Law : बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना रणौत यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला. कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचं वक्तव्य कंगना रणौततने केलं, यानंतर तिच्यावर चौफेर टीका होऊ लागली. भाजपनेही कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यापासून हात वर करत ती तिची वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता कंगनाने वक्तव्य मागे घेतल माफी मागितली आहे.
भाजपने फटकारल्यावर कंगनानं मागितली माफी
खासदार अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हीने एका मुलाखतीत कृषी कायद्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सरकारने रद्दर केलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवे, असं कंगनाने म्हटलं होतं. शेतकऱ्यांनी पंतप्रधानांकडे हे कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करायला हवी, अशी भूमिकाही तिने मांडली होती. मात्र, यानंतर कंगनाच्या वक्तव्याचा भाजपनं निषेध केला.
कृषी कायद्यांसंदर्भातील वक्तव्य घेतलं मागे
कृषी कायद्यासंदर्भातील कंगनाचं वक्तव्य हे भाजपची भूमिका नसून ते तिचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत भाजपने या प्रकरणातून हात झलकले. यानंतर कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माझी वैयक्तिक भूमिक आहे, असं म्हटलं होतं. पण, आता कंगनाने कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचं वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे.
"मी माझे शब्द मागे घेते"
भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) म्हणाली, "गेल्या काही दिवसांत मीडियाने मला शेतकरी कायद्यांसंदर्भात काही प्रश्न विचारले आणि मी सुचवलं की शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना शेतकरी कायदा परत आणण्याची विनंती करावी. माझ्या वक्तल्याने बरेच लोक निराश झाले आहेत. जेव्हा शेतकरी कायदा प्रस्तावित होता, तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्याला पाठिंबा दिला होता, पण आपल्या पंतप्रधानांनी तो अत्यंत संवेदनशीलतेने मागे घेतला आणि त्यांच्या शब्दाचा आदर करणे, हे सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मला आता या गोष्टीचंही भाव राखायला हवं की, मी आता एक कलाकार नाही, तर भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता आहे आणि माझं मत हे माझं मत नाही, तर भाजपची भूमिका असायला हवी. मी माझ्या शब्दांनी आणि विचारांनी कुणाला दुखावलं असेल, तर याचा मला खेद आहे. मी माझे शब्द मागे घेते ."
#WATCH | BJP MP Kangana Ranaut says, "In the last few days the media asked me some questions on farmers' law and I suggested that the farmers should request PM Modi to bring back the farmers' law. Many people are disappointed and disheartened by my statement. When the farmers'… pic.twitter.com/i3O5n05718
— ANI (@ANI) September 25, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :