Vikram Box Office Collection : कमल हसनच्या 'विक्रम'ने केली रेकॉर्डब्रेक कमाई; दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
Vikram : कमल हासनचा विक्रम सिनेमा शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे.
Vikram Box Office Collection : कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता.
'विक्रम'ने केली रेकॉर्डब्रेक कमाई
'विक्रम' सिनेमाच्या माध्यमातून कमल हासनने चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. या सिनेमाची निर्मिती लोकेश कनगराज यांनी केली आहे. सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 34 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमे सुपरहिट
'पुष्पा', 'वलिमै', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता या यादीत 'विक्रम' सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. रिलीजआधीच बजेटपेक्षा अधिक कमाई करणारा कमल हासन यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कंगराजने सांभाळली आहे.
In 2 days, #Vikram crosses the ₹ 100 Cr Mark at the WW Box Office..
— Ramesh Bala (@rameshlaus) June 5, 2022
Phenomenal.. 🔥@ikamalhaasan @VijaySethuOffl #FahadhFaasil @Suriya_offl @Dir_Lokesh @anirudhofficial @RKFI @turmericmediaTM
3 जूनला सिनेमा झाला प्रदर्शित
'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचीदेखील झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत 'विक्रम' सिनेमाची चर्चा
कमल हासनचे चाहते 'विक्रम' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्याच्या चार दिवस आधीच चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर रांगा लाऊन तिकीटे विकत घेतली आहेत. चाहत्यांनी पहाटे चार वाजल्यापासून सिनेमागृहाबाहेर रांगा लावल्या होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या 'विक्रम' सिनेमाचीच चर्चा आहे.
संबंधित बातम्या