एक्स्प्लोर
रजनीकांत यांचा ‘काला’ सिनेमा फेसबुकवरुन लीक करण्याचा प्रयत्न
आरोपीला पकडल्यानंतर रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या यांनी पोलिसांचे आभार मानत म्हटले, “धन्यवाद, पायरसीला संपवण्याची गरज आहे.”
नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ सिनेमा लीक करण्याचा प्रयत्न झाला. थिएटरमध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सिनेमा लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी सिंगापूरमधून अटक केली. प्रवीण तेवर असे आरोपीचे नाव आहे.
थिएटरमध्ये काला सिनेमा पाहत असताना, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सिनेमा लीक करण्याचा प्रयत्न केला गेला.
आरोपीला पकडल्यानंतर रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या यांनी पोलिसांचे आभार मानत म्हटले, “धन्यवाद, पायरसीला संपवण्याची गरज आहे.”
आरोपीच्या फेसबुकवरीलच एका मित्राने प्रसिद्ध अभिनेत्याला फेसबुक लाईव्ह सुरु असताना टॅग केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. जे के जयकिशोर नामक अकाऊंटवरुन सिनेमा लीक करणाऱ्यावर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर अभिनेता विशालने माहिती दिली की, पायरसीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनेक वादांनंतर ‘काला’ सिनेमा प्रदर्शित झाला असून, सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. तिरुनेवलीच्या गँगस्टरवर आधारित सिनेमाची ही कथा आहे. अभिनेते रजनीकांत सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत, तर नाना पाटेकर हे खलनायकाच्या भूमिकेत आहेत.This guy's streams live from Singapore premire show so far he covered first 40 mins of the film plzz report.@beemji @soundaryaarajni @VishalKOfficial @itisprashanth @LycaProductions @wunderbarfilms @dhanushkraja @cinemapayyan @kishen_das @Dhananjayang pic.twitter.com/TjCako53DW
— Jai Kishore (@Jk_jaiki) June 6, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
ऑटो
क्राईम
Advertisement