News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

जस्टिन बिबरच्या शोमुळे महाराष्ट्राला 3.40 कोटी!

FOLLOW US: 
Share:
मुंबई: कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर भारतातली पहिली लाईव्ह कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टमध्ये त्याने स्वत: गाणी न गाता, केवळ लिप सिंक केल्याचा आरोप होत आहे. असं असलं तरी दुसरीकडे जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारला जवळपास 3 कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत.  हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बिबरच्या कार्यक्रमावरील विविध टॅक्समुळे महाराष्ट्र सरकारला ही रक्कम मिळाली आहे. दिल्लीतील व्हाईट फॉक्स कंपनीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी अॅडव्हान्स टॅक्स म्हणून 3 कोटी 7 लाख रुपये जमा करुन घेतले होते. त्यावेळी 35 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा जास्त लोक आल्याने आयोजकांना आणखी 33 लाख भरावे लागतील, असं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, बिबरच्या कॉन्सर्टसाठी देश-विदेशातून 40 हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांनी 15 लाख रुपये अॅडव्हान्सरुपी घेतले होते. सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी आम्ही कॉन्स्टेबलसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये तर अधिकाऱ्यासाठी 2500 रुपये आकारले होते, असं उपायुक्त तुषार दोषी यांनी एचटीला सांगितलं. "30 अधिकाऱ्यांसह जवळपास 700 पोलीस या कॉन्सर्टसाठी तैनात होते. अजून आम्ही हिशेब केलेला नाही, तो करुन आयोजकांना बिल पाठवून देऊ. एकदा कार्यक्रम झाल्यानंतर पैसे वसूल करणं मोठं जिकीरीचं काम असतं. त्यामुळेच आम्ही अॅडव्हान्स रक्कम घेतो", असंही त्यांनी सांगितलं.
Published at : 13 May 2017 01:30 PM (IST) Tags: justin bieber live concert justin bieber in India justin bieber in Mumbai Justin Bieber जस्टिन बिबर Marathi News maharashtra govt abp majha Latest Marathi News

आणखी महत्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Case: Saif Ali Khan Attack Case: 4 दिवस अॅडमिट राहिल्यानंतर 36 लाखांचं बिल? फॉरेन्सिक रिपोर्टनंतर, आता सैफची ट्रिटमेंट वादाच्या भोवऱ्यात

Saif Ali Khan Attack Case: Saif Ali Khan Attack Case: 4 दिवस अॅडमिट राहिल्यानंतर 36 लाखांचं बिल? फॉरेन्सिक रिपोर्टनंतर, आता सैफची ट्रिटमेंट वादाच्या भोवऱ्यात

Rashmika Mandanna Maharani Yesubai: 'छावा'तील मराठा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेसाठी दक्षिणेतील रश्मिकाच का? दिग्दर्शकांनी सांगितलं एक महत्त्वाचं कारण...

Rashmika Mandanna Maharani Yesubai: 'छावा'तील मराठा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेसाठी दक्षिणेतील रश्मिकाच का? दिग्दर्शकांनी सांगितलं एक महत्त्वाचं कारण...

Saif Ali Khan Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता एक महिला पोलिसांच्या ताब्यात; आरोपीशी कनेक्शन, बंगालमधून अटक

Saif Ali Khan Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता एक महिला पोलिसांच्या ताब्यात; आरोपीशी कनेक्शन, बंगालमधून अटक

पद्म पुरस्कारांच्या घोषणेवर सोनू निगमची जाहीर नाराजी, थेट गायकांची नावे घेतल्याने नव्या वादाला तोंड?

पद्म पुरस्कारांच्या घोषणेवर सोनू निगमची जाहीर नाराजी, थेट गायकांची नावे घेतल्याने नव्या वादाला तोंड?

सचिनसोबत खेळला, मध्येच क्रिकेट सोडून झाला अभिनेता, क्रिकेटच्या देवासोबत दिणारा 'हा' हिरो आहे तरी कोण?    

सचिनसोबत खेळला, मध्येच क्रिकेट सोडून झाला अभिनेता, क्रिकेटच्या देवासोबत दिणारा 'हा' हिरो आहे तरी कोण?    

टॉप न्यूज़

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं

धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....

Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह