एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Case: 4 दिवस अॅडमिट राहिल्यानंतर 36 लाखांचं बिल? फॉरेन्सिक रिपोर्टनंतर, आता सैफची ट्रिटमेंट वादाच्या भोवऱ्यात

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान बरा होऊन घरी परतला असून सध्या तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे. पण जसजसे दिवस जात आहेत, तसतसं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे.

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला झाला. त्याच्यावर चोरट्यानं 6 वेळा हल्ला झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानला तात्काळ रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  तब्बल 4 दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर पाचव्या दिवशी सैफला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या सैफ अली खान हल्ला प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच आता सैफ अली खानचं हॉस्पिटलचं बिल आणि त्यानंतर लगेचच मंजूर झालेला इन्शोरन्स क्लेम चर्चेचा विषय ठरत आहे.  

सैफ अली खान बरा होऊन घरी परतला असून सध्या तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे. पण जसजसे दिवस जात आहेत, तसतसं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचं अलिकडेच समोर आलं आहे. एवढंच नाही तर, फॉरेन्सिक रिपोर्टही वेगळीच कहाणी सांगत आहे. हळूहळू अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. हे पुरेसे नव्हतं तर, आता सैफ अली खानवरचे उपचार आणि त्यासाठी झालेला खर्च यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

4 दिवसांत 36 लाखांचं बिल? 

सैफ अली खानवर झालेले संपूर्ण उपचार कॅशलेस इन्शोरन्सवर करण्यात आले. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करताच इन्शोरन्स कंपनीनं तात्काळ 25 लाख रुपये मंजूर केले. पण, 4 दिवसांनी ज्यावेळी सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्याचं बिल 36 लाख रुपये होतं. आता विमा कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, त्यांनी इतक्या लवकर 25 लाख रुपये कसे काय मंजूर केले?

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सकडून प्रश्न उपस्थित 

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सनं IRDAI ला पत्र लिहून या उपचारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. असं सांगितले जात आहे की, अशा प्रकरणांमध्ये विमा कंपनी एफआयआरची प्रत मागते आणि या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु त्यापूर्वीच त्याला 25 लाख रुपयांची मंजुरी मिळाली होती. त्यामुळे यावर असोसिएशननं प्रश्न उपस्थित केला आहे की, सैफ अली खानला सेलिब्रिटी असल्याचा फायदा मिळाला आहे का? कारण जर हे इतर कोणत्याही सामान्य माणसासोबत घडलं असतं, तर विमा कंपनीनं रीजनेबल आणि कस्टमरी चार्ज लागू केले असते आणि क्लेम दिला नसता.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीनं तत्काळ मंजूर केला. पण, सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चकरा माराव्या लागतात. केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्यानं सैफला विशेष वागणूक मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget