JNU Movie Official Teaser : देशविरोधी घोषणा, जय श्रीरामचा जयघोष, PM मोदींचे होर्डिंग, डाव्यांवर निशाणा; 'जेएनयू' चित्रपटाचा टीझर लाँच
JNU Movie Official Teaser : जय श्रीरामचा जयघोष, पंतप्रधान मोदींचे होर्डिंग, डाव्यांवर निशाणा साधणारा जेएनयू चित्रपटाचा टीझर लाँच (JNU movie Official Teaser launch) करण्यात आला आहे.
JNU Movie Official Teaser : देशविरोधी घोषणा, जय श्रीरामचा जयघोष, पंतप्रधान मोदींचे होर्डिंग, डाव्यांवर निशाणा साधणारा जेएनयू चित्रपटाचा टीझर लाँच (JNU movie Official Teaser launch) करण्यात आला आहे. विद्यापीठात शिक्षणाच्या आडून देश तोडण्याच्या कारवाया सुरू आहेत का असा प्रश्न विचारत काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आज टीझर लाँच करण्यात आला. यामध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त घटनादेखील दाखवण्यात आल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे बॉलिवूडमध्ये राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. चित्रपटातील जेएनयू हे जहांगीरदार नॅशनल युनिर्व्हसिटी असे आहे. याच विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणावर यावर भाष्य करण्यात आले आहे.
टीझरमध्ये काय?
टीझरच्या सुरुवातीला व्हाईस ओव्हरमध्ये या जेएनयूमधील विद्यार्थी वर्गात कमी आणि बातम्यांमध्ये अधिक चर्चेत असल्याचे सांगण्यात आले.राजधानी दिल्लीतील एका प्रतिष्ठित विद्यापीठात विद्यार्थी राजकारणाच्या आडून कशाप्रकारे देशाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जेएनयू हा देशविरोधी लोकांचा गड आहे का, असा वृत्तवाहिन्यांमधील निवेदकांचा आवाज आहे. देश, संस्कृती धोक्यात आल्याचे सांगत हिंदुत्ववादी कार्यकर्ता विद्यार्थ्यांना आक्रमक आवाहन करताना दिसत आहे. डाव्यांचा देशविरोधी अजेंडा जेएनयूमध्येच काय तर देशातही चालणार नसल्याचे हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता सांगताना दिसत आहे.
शिक्षणासोबत विविध राजकीय, सामाजिक मुद्यांवर भाष्य ते विद्यार्थ्यांची चळवळ यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रसिद्ध आहे. मात्र, मागील 10 वर्षांपासून जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप सातत्याने उजव्या विचारांचे पक्ष, संघटनांकडून करण्यात आला. जेएनयू या चित्रपटातही याचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सुरू आहे.
चित्रपटात कोणाच्या भूमिका, कधी होणार प्रदर्शित?
या चित्रपटात रवी किशन, पियूष मिश्रा, रश्मी देसाई, उर्वशी रौतेला, सिद्धार्थ बोडके, सोनाली सहगल, विजय राज आदी कलाकारांच्या भूमिका आहे. तर, विनय शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, प्रतिमा दत्ता यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा टीझर : JNU: Jahangir National University - Official Teaser | Urvashi R, Siddharth, Ravi K, Rashami| Pratima