
Jawan New Poster : शाहरुखच्या 'जवान' सिनेमातील Vijay Sethupathi चा डॅशिंग लूक आऊट; लक्ष वेधून घेणारं पोस्टर व्हायरल
Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमातील विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) नवा लूक समोर आला आहे.

Shah Rukh Khan Jawan New Poster Vijay Sethupathi Look Out : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. एटली दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या सिनेमातील शाहरुखच्या लूकचं खूप कौतुक होत आहे. दरम्यान या सिनेमातील विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) लूक आता समोर आला आहे.
'जवान' सिनेमातील विजय सेतुपतीचा लूक व्हायरल...
'जवान' सिनेमातील विजय सेतुपतीचा लूक समोर आला आहे. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून विजय सेतुपती (Vijay Sethupathi) पहिल्यांदाच किंग खानसोबत (King Khan) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
शाहरुख खानने शेअर केलं 'जवान'चं नवं पोस्टर
शाहरुख खानने 'जवान' सिनेमातील विजय सेतुपतीच्या लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"त्याला कोणी थांबवत नाही... त्याला थांबवणारं कोणी आहे का? लक्ष ठेवा". शाहरुखच्या या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहते या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. विजय सेतुपतीच्या या पोस्टरवर 'मृत्यूचा व्यापारी' असे लिहिलेले दिसत आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानचा 'जवान' कधी प्रदर्शित होणार? (Jawan Released Date)
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखसह या सिनेमात नयनतारा (Nayanthara), प्रियामणी (Priyamani), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
शाहरुखचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies)
शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. जगभरात या सिनेमाने 1000 कोटींचा टप्पा पार केला. आता शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'जवान'नंतर शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सलमानच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमातही त्याची झलक पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Jawan Movie New Poster: हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल, शाहरुखचा खतरनाक लूक; जवान चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
