बलात्कारी कुलदीप सेंगर आजारी पडून रुग्णालयात कधी जातो हे पाहाचंय : जावेद अख्तर
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी असलेल्या कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने सेंगरला शिक्षा सुनावल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी यावर खोचक टिप्पणी केली आहे.
Kuldeep Sengar the rapist has been given life term by the court . Now let’s see how soon he gets unwell and is shifted to a hospital .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) December 21, 2019
2017 मध्ये एका तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सिंह सेंगरवर होता. 16 डिसेंबरच्या सुनावणीवेळी तो गुन्हा सिद्ध झाला. उत्तर प्रदेशच्या बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सेंगरची भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी केली आहे.
कोर्टाने 9 ऑगस्ट रोजी कुलदीप सेंगर आणि त्याचा सहकारी शशी सिंह विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गात गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज त्याची सुनावणी झाली.
उन्नाव पीडितेची हृदयद्रावक कहाणी; न्यायासाठी जाताना घात
नेमकं घडलं काय?
उन्नावपासून 50 किलोमीटर अंतरावर हिंदूपूर गाव आहे. गावात मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी आणि पीडित मुलगी अर्ध्या किलोमीटर अंतरावर राहतात. दोन्ही कुटुंबाचे दोन वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत जवळचे संबंध होते. बऱ्याचदा पीडित मुलीच्या कुटुंबाला मदतही केली होती. शिवम आणि पीडित मुलीची हळूहळू मैत्री वाढली आणि दोघं प्रेमात पडले. पीडितेच्या कुटुंबाच्या दाव्यानुसार दोघांनी कोर्टात नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. अर्थात ही बाब कुटुंबाला माहिती नव्हती. काही दिवसांनी शिवम त्रिवेदीनं विवाह केल्याचं मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणं झाली, शिवमच्या कुटुंबानं पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलंही होतं.
काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं? भय इथले संपत नाही | महिला सुरक्षेबाबत महाचर्चा | नागपूर | ABP Majha