Janhvi Kapoor Happy Birthday: वाढदिवसाला जान्हवीनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; शेअर केला NTR 30 मधील लूक, ज्युनिअर एनटीआरसोबत करणार काम
जान्हवीनं 'एनटीआर 30' (NTR 3O) या चित्रपटामधील तिच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता ज्युनिअर एनटीआरसोबत (Jr NTR) जान्हवी स्क्रिन शेअर करणार आहे.
Janhvi Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते. आज वाढदिवसाला जान्हवीनं चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. जान्हवी आता लवकरच साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच जान्हवीनं 'एनटीआर 30' (NTR 3O) या चित्रपटामधील तिच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता ज्युनिअर एनटीआरसोबत (Jr NTR) जान्हवी स्क्रिन शेअर करणार आहे.
जान्हवीची इच्छा होणार पूर्ण
एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरनं ज्युनिअर एनटीआरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिची इच्छा पूर्ण होणार आहे. ती ज्युनिअर एनटीआरसोबत 'एनटीआर 30' (NTR 3O) या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवी आणि ज्युनिअर एनटीआर यांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
जान्हवीनं शेअर केला 'एनटीआर 30' मधील लूकचा फोटो
जान्हवीनं सोशल मीडियावर तिचा 'एनटीआर 30' या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती साडी आणि मोकळे केस अशा सिंपल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'हे फायनली होत आहे. माझ्या आवडत्या ज्युनिअर एनटीआरसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ' जान्हवीनं शेअर केलेल्या या फोटोला अनेकांनी लाईक केलं आहे. तसेच काही युजर्सनं जान्हवीच्या या फोटोला कमेंट करुन या आगामी चित्रपटासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
जान्हवीचे आगामी चित्रपट
'एनटीआर 30' या चित्रपटासोबतच जान्हवीचे बवाल, मिस्टर अॅन्ड मिसेस माही आणि दोस्ताना-2 हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. आता तिच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जान्हवी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 21.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. जान्हवी तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: