Janhvi Kapoor Birthday : जान्हवी कपूरच्या 'Devara'चं फर्स्ट लूक पोस्टर आऊट! वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
Janhvi Kapoor First look Poster : 'देवरा' (Devara) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.
Janhvi Kapoor First Look Poster : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) सध्या त्याच्या आगामी 'देवरा' (Devara) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'देवरा' या सिनेमातील जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी निर्मात्यांनी तिला पोस्टर शेअर करत खास भेट दिली आहे.
जान्हवी कपूरच्या वाढदिवशी (Janhvi Kapoor Birthday) निर्मात्यांनी तिला खास भेट दिली आहे. जान्हवीच्या आगामी सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर निर्मात्यांनी आऊट केलं आहे. पोस्टर आऊट करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"आमची थंगम जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा".
जान्हवीच्या 'देवरा'ची चाहत्यांना उत्सुकता
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. एकीकडे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे काही चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'देवरा'तील जान्हवीचं फर्स्ट लूक पोस्टर आऊट झाल्याने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'देवरा' ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर काही चाहते जान्हवी आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
'देवरा' कधी रिलीज होणार? (Devara Release Date)
'देवरा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कोरताला शिवाने सांभाळली आहे. निर्माते एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज करू शकतात. ज्युनियर एनटीआरचा हा सिनेमा 10 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'देवरा' या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर सैफ अली खानदेखील (Saif Ali Khan) एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 'देवरा' या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ज्युनियर एनटीआरसह दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणसोबतही जान्हवी स्क्रीन शेअर करू शकते.
जान्हवी कपूरच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Janhvi Kapoor Upcoming Movies)
जान्हवी कपूरचा 'बवाल' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ती वरुण धवनसोबत झळकली होती. राजकुमार रावच्या 'मिस्टर अँड मिसेज माही' या सिनेमातही ती झळकणार आहे. तसेच 'उलझ' हा तिचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या