एक्स्प्लोर
श्रीदेवीची मुलगी जान्हवीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत तर कधी तिच्या रिलेशनशिपबाबत जान्हवीची कायम चर्चा सुरु असते. पण सध्या एका व्हिडीओमुळे जान्हवी प्रकाशझोतात आली आहे. बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी तिचा बॉयफ्रेण्ड शिखर पहारियासोबत डान्स करताना दिसत आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेड लेहंगा परिधान केलेल्या जान्हवीचा डान्सही जबरदस्त आहे.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचं म्हटलं जात आहे. मराठीतील सुपरहिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक करण जोहर बनवत आहे, त्यात जान्हवी काम करणार असल्याची चर्चा आहे. पण याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
#gorgeous #young #charming #janvikapoor in #CustomMade #RineStone top #worn with a #Fringe Lehanga #Skirt #Red with #BeigeGold #Dupatta #Newlook #2017 #manishmalhotralabel #timeless #glamorous #manishmalhotraworld @mmalhotraworld #indian #Fashion #Style #love A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
बुलढाणा
निवडणूक























