Jaideep Ahlawat On Taimur : तैमूरचे वागणं पाहुन जयदीप अहलावतला बसला धक्का; अनुभव सांगताना म्हणाला...
Jaideep Ahlawat On Taimur : अभिनेता जयदीप अहलावत याने तैमूरचे कौतुक करताना तो संस्कारी मुलगा असल्याचे म्हटले आहे. सैफ अली खान आणि करीनाने त्याच्यावर चांगले संस्कार केले असल्याचे जयदीपने म्हटले.
Jaideep Ahlawat On Taimur : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor) मुलगा तैमूर (Taimur) हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. पॅप्सही तैमूरचे चाहते आहेत. पॅप्स पाहताच अनेकदा तैमूर स्वत:हून फोटोसाठी उभे राहतो. तैमूरच्या फोटो, व्हिडीओवर अनेकदा नकारात्मक कमेंट्स येतात. अनेकदा रितेश देशमुखच्या मुलांसोबत त्याची तुलना केली जाते. तैमूरच्या संस्कारावरही ट्रोलर्स बोट दाखवत असतात. मात्र, एका मुलाखतीत अभिनेता जयदीप अहलावत याने तैमूरचे कौतुक करताना तो संस्कारी मुलगा असल्याचे म्हटले. सैफ अली खान आणि करीनाने त्याच्यावर चांगले संस्कार केले असल्याचे जयदीपने म्हटले.
करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे सेलिब्रिटी कपल असूनही आपल्या मुलांचे संगोपन तर योग्य प्रकारे करत आहेतच पण त्यांना चांगले संस्कारही दिले असल्याचे जयदीप अहलावतने सांगितले. 'मॅशेबल इंडिया'शी बोलताना तैमूरसोबतच्या पहिल्या भेटीचा त्याने किस्सा सांगितला. तैमूरचे संस्कार आणि अतिशय शिस्तबद्ध वर्तन पाहून आश्चर्यचकित झालो असल्याचे त्याने सांगितले.
View this post on Instagram
तैमूरच्या प्रश्नांसाठी उत्तर नाही, त्याचं वागणं पाहून कौतुक...
जयदीप अहलावतने करीना कपूरसोबत 'जाने जान'या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तैमूर आणि जेह हे देखील येत असे. त्या दरम्यानचा एक किस्सा जयदीपने सांगितला. त्याने सांगितले की, तैमूर खूप जिज्ञासू मुलगा आहे. त्याला खूप प्रश्न विचारायचे असतात. हे काय आहे...काय चालले आहे त्यात? तुम्ही कोणती भूमिका करत आहात? तुम्हाला मला ही गोष्ट सांगता येत नाही का, असे प्रश्न विचारत असे. एकदा सैफ अली खानने सांगितले की, हे मम्माच्या चित्रपटात मु्ख्य अभिनेता आहे. त्यावर तैमूरने, ओह...ओके, ऑल द बेस्ट असे म्हटले. ऑल द बेस्ट बोलल्यानंतर एकदम स्टाइलने तिथून तो निघून गेला.
View this post on Instagram
करीना-सैफचे चांगले संस्कार, तैमूर स्मार्ट मुलगा
जयदीप अहलावतने सांगितले की, तैमूरने जेवताना अन्न वाया घालवू नये याकडे सैफ आणि करीना विशेष लक्ष देतात. अन्नाचे महत्त्व काय आहे, हे सांगण्याकडे त्यांचा कल असतो. या दोघांनी तैमूरला आदर, शिष्टाचार शिकवला आहे. तैमूर खूप स्मार्ट आणि आत्मविश्वासू आहे. आता तो कपूर घराण्याचा, नवाब कुटुंबाचा मुलगा आहे. आता जर त्यांना चांगल्या सवयी नसतील तर त्यांच्याकडे काय असेल? पण त्यांनी (सैफ आणि करीना) मुलांची चांगली काळजी घेतली आहे. कामाच्या बाबतीतही हेच शिकवले आहे. मी पाहिले आहे की करीना आणि सैफ म्हणायचे की हे पुस्तक इथून उचल आणि ते तिथे ठेव. नीट खाणे, अन्नाची नासाडी न करणे यासारख्या लहानसहान सवयी त्यांनी आपल्या मुलामध्ये रुजवल्या आहेत.