एक्स्प्लोर
तो पाऊस नव्हे, विंडीजचे अश्रू होते, बिग बींचं हटके ट्विट
वॉशिंग्टन : वेस्ट इंडिजविरुद्धचा लॉडरहिलचा दुसरा ट्वेन्टी20 सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला.
आधी तांत्रिक अडचणींमुळं लांबणीवर पडलेली सुरूवात आणि मग पावसानं आणलेला व्यत्यय यामुळं या सामन्यात चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त केली. एरव्ही टीम इंडियाचा डॅशिंग माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर हटके ट्विट करताना दिसतो. मात्र काल अमिताभ बच्चन यांचंही तसंच ट्विट पाहायला मिळाले.
बिग बी यांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. "पावसाने भारत - वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी ट्वेण्टी सामना थांबवला. मात्र हा पाऊस नव्हे तर विंडिजच्या ढगांचे दु:खाचे अश्रू होते. ज्यांनी अक्षरश: रडून कबुली दिली की भारतच जिंकला", असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
T 2362 -बारिश गिरी INDvWI, खेल रोक दिया, ये बारिश नहीं, ये WI बादलों के दुःख के आंसू थे , जिन्होंने क़ुबूल कर दिया रो कर, की IND jeet gayi !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 28, 2016
T 2362 - INDvWI T20, rain stops play .. ! That is an admittance by nature of the inevitable INDIAN victory !! Thank you RAINGODS ! — Amitabh Bachchan (@SrBachchan) August 28, 2016भारतीय गोलंदाजांची कमाल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता या लढतीला सुरूवात होणं अपेक्षित होतं. पण आल्यानं प्रत्यक्षात तब्ब्ल चाळीस मिनिटं उशीरानं सामना सुरू झाला. तांत्रिक कारणांमुळं हा उशीर झाल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं. मग खेळ सुरू झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा डाव 19 षटकं आणि चार चेंडूंमध्ये 143 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर भारतानं दोन षटकांत बिनबाद पंधरा धावांची मजल मारली. त्यानंतर पाऊस कोसळू लागल्याने भारतीय संघाच्या मालिकेत बरोबरी साधण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या.
संबंधित बातम्या
भारताविरुद्ध दुसरा टी20 सामना रद्द, मालिका विंडीजच्या खिशात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement