एक्स्प्लोर

India Vs New Zealand Semi-Final : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी वानखेडेवर, भारत-न्यूझीलंड सामन्याला उपस्थिती

India Vs New Zealand Semi-Final : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी (Nita Ambani) आजच्या भारत-न्यूझीलंड सामन्याला उपस्थित राहणार आहेत.

India Vs New Zealand Semi-Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आज इंडिया विरोधात न्युझीलंडचा (IND Vs NZ Semi-Final) सामना होणार आहे. दिवाळीची सुट्टी आणि त्यातच इंडिया विरोधात न्युझीलंडचा क्रिकेट सामना असल्याने देशभरात चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. क्रिकेटप्रेमींसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीदेखील या सामन्यासाठी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी (Nita Ambani) आजच्या भारत-न्यूझीलंड सामन्याला उपस्थित राहणार आहेत.  

मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत न्यूझीलंड सेमीफायनलला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाची मालकीण आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा नीता अंबानी

नीता अंबानी या क्रिकेटचे सामने पाहायला अनेकदा जात असतात. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची मालकीण म्हणून त्या आपलं काम चोख बजावतात. काही दिवसांपूर्वी मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा असणाऱ्या नीता अंबानी यांनी महिलादेखील क्रिकेटमध्ये क्रांती घडवतील, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. 

 नीता अंबानींसह 'हे' सेलिब्रिटीही राहणार उपस्थित 

आजच्या भारत न्यूझिलंड सेमीफायनलला (IND Vs NZ Semi-Final) अनेक सेलिब्रिटीज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच बेकहॅम ही युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळे आजच्या सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती लावू शकतो. त्याचप्रमाणे गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला असतील अशी माहिती आहे. जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार विविअन रिचर्डस्,  अभिनेता सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. 

संबंधित बातम्या

India vs New Zealand Semi final : डेव्हिड बॅकहम, बिग बी ते रजनीकांत; आजच्या सामन्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget