IFFI 2022 : 'इफ्फी'मध्ये दिग्गजांची उपस्थिती; 'द कश्मीर फाइल्सच्या स्क्रीनिंगला अनुपम खेर यांची हजेरी
Anupam Kher : अनुपम खेर यांच्या उपस्थित 'द कश्मीर फाइल्स'चं स्क्रीनिंग पार पडलं आहे.
Anupam Kher In IFFI 2022 : 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival 2022) गोव्यात सुरू आहे. या महोत्सवात अनेक सिनेमे दाखवले जात आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या उपस्थितीत या सिनेमाचं स्क्रीनिंग पार पडलं.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुपम खेर म्हणाले,"इफ्फी' सारख्या महोत्सवात 'द कश्मीर फाइल्स'चं स्क्रीनिंग होत असल्याचा आनंद आहे. जागतिक पातळीवरच्या या महोत्सवात विविध विषयांवरील सिनेमे दाखवले जात आहेत. गेल्या 38 वर्षांपासून मी या महोत्सवाला हजेरी लावत आहे. चांगल्या दर्जाचे सिनेमे या महोत्सवात दाखवले जातात".
View this post on Instagram
'द कश्मीर फाइल्स'ची रेकॉर्डब्रेक कमाई!
'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या सिनेमात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 350 कोटींची कमाई केली आहे.
अनुपम खेरचे आगामी सिनेमे
अनुपम खेरचे आगामी प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विद्दुत जामवालच्या आगामी सिनेमात ते दिसणार आहेत. संकल्प रेड्डीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन आणि नाट्य पाहायला मिळणार आहे.
सिनेप्रेमींच्या उपस्थित रंगतोय चित्रपट महोत्सव...
'अल्मा आणि ऑस्कर' या सिनेमाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. डायटर बर्नरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या 'परफेक्ट नंबर' या सिनेमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोरोनानंतर दोन वर्षांनी होत असल्याने या महोत्सावाला अनेक दिग्गज उपस्थिती लावत आहेत. कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेप्रेमींच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव पार पडतो आहे.
संबंधित बातम्या