एक्स्प्लोर
'मी प्रेग्नंट आहे, मेली नाही', करीना भडकली
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच आई होणार आहे. पण वारंवार याबाबत प्रश्न विचारल्यानं करीना पत्रकारांवर चांगलीच भडकली आहे.
प्रेग्नंट असतानाही करीना वारंवार सिनेमाचं शुटींग करीत आहेत. याच प्रश्नावर करीना लालबुंद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्रकारानं करीनाला प्रश्न विचाराला की, वारंवार शुटींग करणारी करीना मेटर्निटी लिव्ह का घेत नाही? या प्रश्नानंतर करीनाचा भलताच पारा चढला.
या प्रश्नाचं करीनानं फारच तिरकस उत्तर दिलं. 'मी प्रेग्नंट आहे. मेलेली नाही. आणि कसली मेटर्निटी लिव्ह? मुल जन्माला घालणं ही सामान्य गोष्ट आहे. मीडियानं या गोष्टीला फारच महत्व दिलं आहे.
आपण 2016 मध्ये जगत आहोत 1800 मध्ये नाही. ज्यांना माझ्यासोबत काम करायला त्रास वाटतो. त्यांनी माझ्या सोबत काम नाही केलं तरी चालेल. लग्न करणं किंवा मुलं जन्माला घालणं हे माझ्या करिअरच्या आड येऊ शकत नाही.' असं म्हणत करीनानं आपला संताप व्यक्त केला.
करीना आई होणार आहे ही गोष्ट खुद्द सैफ अली खाननं जाहीर केली होती. पण करीनाला राग आला कारण की, तिचे काही फोटो मीडियामध्ये आले आहेत. त्यामुळे ती नाराज झाली.
मधल्या काळात करीना आणि सैफनं लंडनमध्ये जाऊन लिंग परीक्षण केलं असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, सैफ आणि करीनानं ही गोष्ट नाकारली.
करीना सध्या आपला नवा सिनेमा 'वीरे दी वेडींग'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
संबंधित बातम्या:
करीनाच्या प्रेग्नन्सीवर सैफच्या पहिल्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?
प्रेग्नन्सीच्या प्रश्नावर करिना कपूरचा खुलासा
करीना आणि सैफ लवकरच आई-बाबा बनणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement