एक्स्प्लोर
दिशासोबत मी फ्लर्ट केल्याच्या बातम्या निरर्थक : हृतिक
'पत्रिका'च्या वेबसाईटवरील वृत्ताचा स्क्रीनशॉस्ट ट्विटरवर पोस्ट करत हृतिकने चांगलंच धारेवर धरलं आहे.

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने फ्लर्ट केल्यामुळे अभिनेत्री दिशा पटाणीने चित्रपट सोडल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण हृतिकने दिलं आहे. 'पत्रिका'च्या वेबसाईटवरील वृत्ताचा स्क्रीनशॉस्ट ट्विटरवर पोस्ट करत हृतिकने चांगलंच धारेवर धरलं आहे. ''यशराज फिल्म्स'च्या डान्स-अॅक्शन चित्रपटाला दिशा पटाणीने रामराम ठोकला. याचं कारण म्हणजे हृतिक रोशनने तिच्यासोबत केलेलं फ्लर्टिंग. अन्कम्फर्टेबल झाल्यामुळे दिशाला अखेर सिनेमा सोडावा लागला' असं पत्रिका वेबसाईटवरील बातमीत म्हटलं होतं. 'माझे प्रिय मित्र पत्रिका जी, कसरत करता का? थोडं जिमला जात जा. डोक्यातून कचरा काढून टाका. 20 डाँकी किक्स, 20 मंकी रोल्स, दोन डॉग जम्प्स तुमच्यासाठी चांगल्या ठरतील. नक्की प्रयत्न करा. शुभेच्छा. गुड डे. लव्ह यू टू' असं ट्वीट हृतिकने केलं. अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या गंभीर आरोपानंतर आणखी एका अभिनेत्रीने हृतिकला कंटाळून सिनेमा सोडला असा उल्लेख या बातमीत होता.
मेरे प्यारे मित्र ‘पत्रिका जी”, कसरत करते हो? थोड़ा gym जाओ। mind से सारा कचरा निकल जाएगा! ख़ासकर बीस donkey किक्स, बीस monkey रोल & 2 dog jumps आप के लिए सही रहेगा। ज़रूर कीजिएगा। गुड luck. गुड day. And लव you टू :) pic.twitter.com/ikuNWmie21
— Hrithik Roshan (@iHrithik) August 28, 2018
'माझ्या आणि हृतिक सरांबद्दल अत्यंत बालिश आणि बेजबाबदार गॉसिप सुरु आहे. ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हा दोघांमध्ये फार थोडं बोलणं झालं, मात्र ते अत्यंत प्रतिष्ठित आणि मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांच्यासोबत असेलल्या कोणत्याही प्रोजेक्टमधून मी माघार घेतल्याचं वृत्त खोटं आहे.' असं दिशाने म्हटलं आहे.‘भास्कर bhaisaab? कहाँ हो? हाल चाल सब? सब ठीक? देखिए, आपकी दुकान ki प्रगति के लिए मेरी तरफ़ से यह ट्वीट. Next time सीधे बोल देना की help चाहिए। pic.twitter.com/f92izpXh1v
— Hrithik Roshan (@iHrithik) August 28, 2018
आणखी वाचा























