एक्स्प्लोर

Vikram Vedha : हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ रचणार नवा विक्रम! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्या’ देशांमध्ये होणार रिलीज

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे.

Vrikram Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार आहेत. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरणार आहे.

भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित केला जाणार आहे.

साऊथ चित्रपटाचा रिमेक

‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'विक्रम वेधा'चे पोस्टर आणि ट्रेलर या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहेत. पोस्टरमध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरमधून दिसते आहे.

ट्रेलरनेही रचला विक्रम!

'विक्रम वेधा'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरला अवघ्या पाच तासांत पाच मिलियन व्ह्यूज मिळाले होते. 'विक्रम वेधा' या चित्रपटात सैफ अली खान ‘विक्रम’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, हृतिक रोशन ‘वेधा’च्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा या चित्रपटातील लूक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!

Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report
Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget