(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hemangi Kavi : 'हा' सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून इतका यशस्वी कसा? हेमांगी कवीची शाहरुखसाठी खास पोस्ट
Hemangi Kavi : हेमांगी कवीने 'पठाण' सिनेमामुळे शाहरुख खानवर होत असलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे.
Hemangi Kavi On Shah Rukh Khan Pathan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'चा (Pathan) सध्या सर्वत्र बोलबाला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखचं आणि 'पठाण' सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री आणि रोखठोक मतांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे.
हेमांगीने लिहिलं आहे,"तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरचं बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आली आहे. पण आता ही थांबवुया... काय? त्याच्या धर्मामुळे, हिरो लुक नसल्यामुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. मी त्याची फॅन आहे कळल्यावर अनेकांनी मला अनफॉलो केलं याहून बालिश प्रकार मी पाहिला नाही".
हेमांगीने पुढे लिहिलं आहे,"मला वाटतं द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वत:ची त्याच्याशी तुलना करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही. सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारुन घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना सिनेमागृहात आणण्याचं काम हाच करू शकतो. स्वत:च्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेल्या संयमाचं कौतुक".
View this post on Instagram
हेमांगी पुढे म्हणते,"उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए. पन्नाशीनंतर रिटायरमेंटचे प्लॅन करुन मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून शिकूया. तुमच्या 57 व्या वर्षी जर तुम्ही 20-22 वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला बाकी... झूमे जो पठाण मेरी जान, महफिल ही लूट जाए".
पाकिस्तानला मदत करणाऱ्याचं एवढं कौतुक? भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या जवानांचा तरी विचार करायचा, आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, आपल्या मराठी सिनेमांचं असं कौतुक केलं तर बरं होईल, हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अशा कमेंट्स केल्या आहेत.
शाहरुखचे चाहते 'पठाण' सिनेमाचं कौतुक करत असले तरी दुसरीकडे मात्र नेटकऱ्यांनी शाहरुखला प्रचंड ट्रोल केलं आहे. पण तरीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
संबंधित बातम्या