(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hema Malini Most Expensive Film : हेमा मालिनी यांचा सर्वात महागडा चित्रपट, ज्यामुळे अख्खं बॉलिवूड कर्जात बुडालं; डायरेक्टरचं करिअर उद्ध्वस्त झालं
Hema Malini Film Razia Sultan: रझिया सुलतान, कमाल अमरोही यांचा भारतातील एकमेव महिला मुस्लिम शासकाचा बायोपिक, अखेर 1983 मध्ये प्रदर्शित झाला.
Hema Malini Most Expensive Film : 1970 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळा बदल दिसून आला. अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅनच्या धमाकेदार सुरुवातीमुळे रुपेरी पडद्यावर झळकणारे चित्रपट आणखी भव्य आणि मोठे झाले. शोले रिलीज झाल्यानंतर लगेचच, चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांनी त्याच प्रमाणात पीरियड ड्रामा बनवण्याचा निर्णय घेतला. त्याचा ड्रीम प्रोजेक्ट जो पुढचा मुघल-ए-आझम होता, तो बनवायला तब्बल सात वर्ष लागली. पण त्याचे परिणाम पुढे इतके घातक होते की, संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कर्जात बुडाली.
रझिया सुल्तानची शोकांतिका
रझिया सुलतान, कमाल अमरोही यांचा भारतातील एकमेव महिला मुस्लिम शासकाचा बायोपिक, जो 1983 मध्ये प्रदर्शित झाला. असं म्हटलं जातं की, हा चित्रपट 10 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्यामुळे तो त्यावेळचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट बनला होता. हेमा मालिनी मुख्य भूमिकेत असलेला आणि धर्मेंद्र, परवीन बाबी, सोहराब मोदी आणि अजित यांचा समावेश असलेला हा चित्रपट त्याच्या काळातील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. पण, रिलीज होताच, तो सपशेल फ्लॉप ठरला. प्रेक्षकांना चित्रपटात वापरलेली उर्दू भाषा फारच अवघड वाटली, तर काहींनी चित्रपटाच्या लांबलचक ड्युरेशनची तक्रार केली. गुलाम योद्धा याकूतच्या भूमिकेसाठी धर्मेंद्रचा ब्लॅकफेसमध्ये वापर करण्यात आला होता. प्रेक्षकांना हे फारच विचित्र वाटलं. या सर्व कारणांमुळे सर्वात महागडा रझिया सुलतान बुडाला. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा महागडा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फक्त 2 कोटी रुपयांची कमाई करू शकला.
रझिया सुलतानमध्ये हेमा मालिनी, परवीन बाबी यांच्या किसिंग सीनवरून वाद
रझिया सुलतानमधील एक थीम टायट्युलर राणीच्या एकाकीपणाबद्दल होती. या चित्रपटात तिचा याकूतसोबतचा प्रणय दाखवण्यात आला होता. पण, तिची जोडीदार खाकुन (परवीन बाबी) सोबतच्या तिच्या जवळीकतेबद्दल एक वादग्रस्त ट्रॅक देखील दाखवला होता. दोन महिलांचं नातं प्लॅटोनिकपेक्षा अधिक दाखवण्यासाठी कमाल अमरोही यांनी दोन पात्रांमधील प्रेमगीत समाविष्ट केलं. गालावर एक चुंबन घेऊन ते संपलं. मात्र, प्रेक्षकांमध्ये या चुंबनाचं समलैंगिक चुंबन म्हणून वर्णन करण्यात आलं. त्यामुळे चित्रपटाला आणखी नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. कौटुंबिक प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यास नकार दिला आणि मुस्लिम धर्मगुरूंनीही चित्रपटात मुस्लिम महिलांच्या 'अयोग्य' चित्रणावर आक्षेप घेतला.
अख्खी इंडस्ट्री कर्जात बुडाली...
रजिया सुल्तान, हा एक असा प्रोजोक्ट होता, ज्याला तयार करायला बरीच वर्ष लागली. हा चित्रपट तयार करण्यासाठी शोले चित्रपटापेक्षा 60 टक्के अधिक खर्च झाला होता. या चित्रपटात शेकडो तंत्रज्ञ आणि हजारो अभिनेते एक्स्ट्रा म्हणून काम करत होते. अमरोहीने चित्रपट उद्योगाकडून कर्ज घेतलं होतं आणि चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनेक क्रू मेंबर्सचे पैसेही रोखून धरले होते. तसेच, सर्व पैसे रिलीजनंतर ते परत करण्याचे आश्वासन दिलं होतं. पण चित्रपटानं 80 टक्क्यांचा मोठा तोटा नोंदवला, ज्यामुळे परतावा शून्य झाला. यानंतर कमाल अमरोही यांनी स्वतःच्या खिशातून अनेकांचे पैसे चुकते केले. IMDb नुसार, जवळजवळ संपूर्ण हिंदी चित्रपट उद्योग काही काळ कर्जात बुडाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :