Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Most Viewed Shows-Films : 'हीरामंडी' ते 'जमनापार'पर्यंत अनेक वेबसीरिज (Web Series) आणि चित्रपट मागच्या आठवड्यात अनेक लोकांनी पाहिले आहेत. या सीरिजला ओटीटीवर मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
![Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत Heeramandi Jamnapar Balveer 4 The Great Indian Kapil Show Top 5 Most Watched Web Series And Movies Previous Week Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/6ff71bca9fef88b7e79a40c79202d7ac1716871541497254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Most Viewed Movies And Web Series : ओटीटी (OTT) विश्वाचा काही दिवसांपासून चांगलाच प्रसार होत आहे. चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. 'हीरामंडी' (Heeramandi) ते 'जमनापार' (Jamnapar) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि चित्रपट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटांना आणि वेबसीरिजला मागील आठवड्यात ओटीटीवर मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड (Baahubali : The Crown of Blood) : 'बाहुबली: द क्राउन ऑफ बॉलिवूड' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. या सीरिजला मागील आठवड्यात चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. फिल्म कंपॅनियननुसार, 'बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड'ला 4 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) : कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा चाहत्यांचा आवडीचा कार्यक्रम आहे. मागील आठवड्याच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि फराह खान यांनी हजेरी लावली होती. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. 3.4 मिलियन लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आहे.
बालवीर 4 (Baalveer 4) : सुपरनॅचरल पावर्सवर आधारित 'बालवीर' हा कार्यक्रम लहान मुलांसह तरुणांनादेखील आवडतो. या कार्यक्रमाचा चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनी लिव्हवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. मागील आठवड्यात 'बालवीर 4' अनेक लोकांनी पाहिला. 2.1 मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
जमनापार (Jamnapar) : रित्विक साहोरे आणि वरुण बडोला यांची 'जमनापार' सीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अॅमेझॉन मीनी टीव्हीवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. मागील आठवड्यात ही सीरिज 1.9 मिलियन लोकांनी पाहिली.
'हीरामंडी' (Heeramandi) : संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही सीरिज 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. रिलीज झाल्यापासून ही सीरिज चर्चेत आहे. 8 भागांची ही सीरिज गेल्या काही आठवड्यांपासून टॉप वॉच्ड लिस्टमध्ये सामिल आहे. गेल्या आठवड्यात ही सीरिज 1.8 मिलियन लोकांनी पाहिली आहे.
'जमनापार', 'हीरामंडी' या वेबसीरिज एकीकडे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना दुसरीकडे आता बहुप्रतीक्षित 'पंचायत 3' (Panchayat 3) ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे आता 'पंचायत 3' ही सीरिज या सर्व सीरिजचा रेकॉर्ड ब्रेक करू शकते. 'पंचायत 3' या सीरिजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
संबंधित बातम्या
Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)