एक्स्प्लोर

Hardeek Joshi : 'जाऊ बाई गावात' फक्त तिच्यामुळे करतोय, पण कार्यक्रम पाहायला ती या जगात नाही; हार्दिक जोशीने व्यक्त केली खंत

Jau Bai Gavat : 'जाऊ बाई गावात' या नुकत्याच सुरू झालेल्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jau Bai Gavat : 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमाच्या हटके कथानकाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. हार्दिक जोशी (Hardeek Joshi)  हा कार्यक्रम एका वेगळ्या अंदाजात होस्ट करत आहे.

'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा कॉल आला तेव्हा हार्दिकची प्रतिक्रिया होती?

हार्दिक जोशी म्हणाला,"माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की सूत्रसंचालन आणि मी? पण नेहमी आव्हानात्मक गोष्टी करायची आवड असल्यामुळे मी ह्या संधीचा  विचार केला, थोडा वेळ घेतला, पण झी मराठीचा माझ्यावरती जो विश्वास आहे, जसं आमचं नातं आहे माझ्यासाठी हा निर्णय घेणं त्यांनी सोप्प केलं. मनात थोडीशी धाक धुक ही होती की प्रेक्षक मला ह्या भूमिकेत स्वीकारतील का?  पण आम्ही वर्कशॉप सुरु केलं आणि ते माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरलं. ही संधी सोडायची नव्हती कारण एक कलाकार म्हणून शब्दांचा साठा वाढला पाहिजे असं माझं मत आहे आणि संधीच सोनं करणं आपल्या हातात असतं". 

इतके वेगळ्या विचारांच्या मुलींसोबत कार्य करणे त्यांना गावच्या मातीचे आणि संस्कृतीचे महत्त्व समजवणे हार्दिकसाठी किती आव्हानात्मक आहे?

हार्दिक म्हणतो,"जाऊ बाई जोरात' कार्यक्रमाचे स्पर्धक वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीमधून आल्या आहेत त्यांनी आपलं आयुष्य खूप ऐशोआरामात जगलं आहे. त्यांचा समाजाकडे पाहण्याचा  दृष्टिकोन वेगळा आहे. पण  जे चूक आहे ते चूक आहे आणि तिथे बोललं गेलंच पाहिजे  पाहिजे आणि मी तेच करत आहे. जिथे आपल्या परंपरेचा- संस्कृतीचा विषय येतो तिथे त्यांना समजवून देणं एक नागरिक आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून माझं कर्तव्य आहे असे मानतो. माझ्या पहिल्या मालिकेत 'तुझ्यात जीव रंगला' मध्ये राणादा मुलींपासून पासून लांबच होता आणि इथे मी मुलींबरोबर रोज शूटिंग करत आहे

'जाऊ बाई गावात' मध्ये हार्दिकचा आवडता स्पर्धक कोण आहे?

आवडत्या स्पर्धकाबद्दल बोलताना हार्दिक म्हणतो,"सगळेच स्पर्धक हुशार आहेत आणि प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे. त्याच्याकडे कोणत्या विषयाबद्दल माहिती कमी असेल तर मला असं वाटतं की ती कमी पूर्ण करायला त्यांची मदत केली पाहिजे. या शोच्या माध्यमातून त्यांना काही शिकता येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे". 

'जाऊ बाई जोरात'साठी हार्दिकच्या घरातल्यांचा काय प्रतिसाद होता?

हार्दिक म्हणतो,"माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि 'जाऊ बाई गावातचा' पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी  खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तिला नमस्कार करून करतो".

'जाऊ बाई गावात' मध्ये टास्क करण्याचा हार्दिकचा अनुभव कसा आहे? 

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना हार्दिक म्हणतो,"तुम्ही नुकताच आर्मी स्पेशल भाग पहिला असेल त्यात एक टास्क होता जो स्पर्धकांनी करायच्या आधी मी केला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तो आर्मी टास्क करताना माझा हात निखळला, तरी पण मी तो टास्क पूर्ण केला. एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना याची सतत मला काळजी घ्यावी लागते. इतक्या लोकांचा विश्वास, प्रेम आहे माझ्यावर आणि मी कोणालाच निराश होऊ देणार नाही. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पडणार". 

संबंधित बातम्या

Jau Bai Gavat:"बोलताना विचार करुन बोल जा"; जाऊ बाई गावातमध्ये हार्दिकनं मुक्ताला सुनावलं!

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget