Hardeek Joshi : राणादा आता गाजवणार रुपेरी पडदा; हार्दिक जोशीच्या 'क्लब 52'चा टीझर आऊट
Hardeek Joshi : हार्दिक जोशीच्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Hardeek Joshi New Project Club 52 Movie Teaser Out : हार्दिक जोशी (Hardeek Joshi) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) आणि 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकांच्या माध्यमातून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील त्याची राणादा ही भूमिका चांगलीच गाजली. आजही राणादा म्हणून तो घराघरांत ओळखला जातो. पण प्रेक्षकांचा लाडका राणादा आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. हार्दिक जोशी 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हार्दिकच्या 'क्लब 52'चा टीझर आऊट! (Hardeek Joshi Club 52 Teaser Out)
दमदार स्टारकास्ट असलेल्या 'क्लब 52' या सिनेमाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिति असलेल्या वैशाली ठाकुर निर्मित 'क्लब 52' हा सिनेमा 15 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
हार्दिक जोशीने सोशल मीडियावर 'क्लब 52' या सिनेमाचं टीझर पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"क्षणक्षणाला बदलतो आहे इकडे खेळ...उघडत आहे 'क्लब 52' 15 डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात". हार्दिक जोशीच्या या टीझर पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्याचं अभिनंदन केलं आहे.
दमदार स्टारकास्ट असलेला 'क्लब 52'
हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी 'क्लब 52' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.
'एक डाव नियतीचा' अशी टॅगलाईन असलेल्या 'क्लब 52' या सिनेमाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून चित्रपटाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे. राणादाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या