(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Shilpa Shetty : जाहिरातीतून केली करिअरची सुरुवात, आता बॉलिवूडला देतेय फिटनेस गोल्स! अभिनेत्री शिल्पा शेट्टीबद्दल खास गोष्टी...
Shilpa Shetty Birthday : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आज (8 जून) तिचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे.
Shilpa Shetty Birthday : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आज (8 जून) तिचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा आता दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं. कारण, इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. शिल्पा जितकी उत्तम डान्सर आहे, तितकाच सुंदर ती अभिनयही करते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती. आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय.
सध्या शिल्पा शेट्टी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्या ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे. शिल्पा शेट्टीचा जन्म 8 जून 1975 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. 1991मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात केली. एका जाहिरातीतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 1993मध्ये शिल्पाला ‘बाजीगर’ या चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटाद्वारे तिने फिल्मी दुनियेत पहिले पाऊल ठेवले.
कराटे चॅम्पियन आणि व्हॉलीबॉल टीमची कॅप्टन!
आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते. इतकेच नाही तर, ती शाळेत तिच्या व्हॉलीबॉल संघाची कर्णधार देखील होती. यासोबतच ती कराटेमध्येही ब्लॅक बेल्ट देखील आहे.
‘धडकन’ने मिळवून दिली खरी ओळख
‘बाजीगर’ हा शिल्पाचा पहिला चित्रपट असला, तरी तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती ‘धडकन’ याने चित्रपटाने.. शिल्पा शेट्टीने 'धडकन' या चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन बनली. या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांची जोडी खूप पसंत केली गेली होती. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये अक्षय आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरची चर्चा आगीसारखी पसरली होती. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचे प्रेम फुलले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. त्यांच्या नात्याची जितकी चर्चा झाली, तितकीच त्यांच्या ब्रेकअपचीही चर्चा झाली.
अफेअर्सची चर्चा
अक्षयनंतर शिल्पाचे नाव चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबतही जोडले गेले होते. ‘दस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुभव सिन्हा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. अनुभवचे आधीच लग्न झाले होते आणि तो एका मुलाचा बापही होता. केवळ, अनुभव सिन्हा आणि अक्षय कुमारच नाही, तर दबंग सलमान खानसोबत शिल्पा शेट्टीचेही नाव जोडले गेले होते. मात्र, नंतर शिल्पा शेट्टीने बिझनेस पार्टनर असलेल्या राज कुंद्रासोबत लग्न गाठ बांधत सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला.
हेही वाचा :