एक्स्प्लोर

Happy Birthday Rajkummar Rao : कधीकाळी एक वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते, आता प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधी आकारतो राजकुमार राव!

Rajkummar Rao Birthday : आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्राला पात्राला मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याचा आज (31 ऑगस्ट) वाढदिवस आहे.

Rajkummar Rao Birthday : आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्राला पात्राला मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याचा आज (31 ऑगस्ट) वाढदिवस आहे. अभिनेत्याचा जन्म 31 ऑगस्ट 1984 रोजी हरियाणातील गुडगाव येथे झाला. त्याने गुडगावच्या ब्लू बुल्स मॉडेल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची असली तरी, राजकुमारला बालपणापासूनच अभिनयाचे वेड होते. अभिनयाच्या वेडापायी त्याने हरियाणासोडून पुणे गाठले होते. स्ट्रगलच्या काळात जेवणाची भ्रांत असणाऱ्या असतानाही त्याने आपली जिद्द सोडली नाही. त्याने आपला संघर्ष सुरूच ठेवला आणि आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

ग्रॅज्युएशनच्या काळातच राजकुमार राव थिएटरमध्ये सहभागी झाला होता. मनोज बाजपेयींपासून प्रेरित होऊन राजकुमारने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता. राजकुमार रावचे खरे नाव राजकुमार यादव आहे. मनोरंजन विश्वात पदार्पण केल्यानंतर त्याने आपले आडनाव ‘राव’ आणि स्वतःच्या नावात एक अतिरिक्त ‘एम’ जोडले.

.. तेव्हा अकाऊंटमध्ये अवघे 18 रुपये होते!

आपल्या करिअरमधील संघर्षाची आठवण शेअर करताना राजकुमार रावने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘एकदा माझ्याकडे पैसे संपले होते. त्यावेळी माझ्या खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक होते आणि माझ्या मित्राच्या खात्यात 27 रुपये होते. त्यावेळी जेवणासाठी देखील पैसे नव्हते. त्याकाळात आम्हाला एफटीआयआयच्या मित्रांनी मदत केली होती. त्यांनी आमच्या जेवणाची सोय केली होती.’ राजकुमार म्हणाला, मला कामाची प्रचंड आवड होती. दिवसभर ऑडिशन द्यायचो. पण कधीही थकून, पराभूत होऊन घरी बसलो नाही.’ आजघडीला राजकुमार प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधींच मानधन आकारतो.

बॉलिवूडला दिले अनेक हिट चित्रपट

राजकुमार रावने 2010मध्ये ‘रन’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  मात्र, त्याला खरी ओळख ‘लव्ह, सेक्स और धोखा’ या चित्रपटातून मिळाली. ‘रागिनी एमएमएस’, ‘शैतान’, ‘काय पो छे’, ‘स्त्री’, ‘शादी मे जरूर आना’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’ सारख्या चित्रपटांनी त्याच्या प्रसिद्धीमध्ये भर घातली. राजकुमारने ‘शाहिद’, ‘काय पो छे’, ‘सिटीलाइट्स’, ‘अलीगढ’, ‘ट्रॅप्ड’, ‘न्यूटन’, आणि ‘स्त्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

बिग बजेट चित्रपटांची रांग

येत्या काही दिवसांत राजकुमार अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यांची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही अभिनेत्री राजकुमारच्या आगामी 'सेकंड इनिंग' या चित्रपटात क्रिती सेननसोबत दिसणार आहे. त्यानंतर तो दिग्दर्शक राज आणि डीके यांच्या 'गन्स अँड रोझेस', अनुभव सिन्हाचा 'भीड', नेटफ्लिक्सचा 'मोनिका ओ माय डार्लिंग',धर्मा प्रॉडक्शनच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि तेलुगू चित्रपट 'हिट: द फर्स्ट केस'च्या हिंदी रिमेकशिवाय तुषार हिरानंदानी दिग्दर्शित बायोपिक 'श्रीकांत भोला'मध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

Rajkummar Rao : राजकुमार रावने शेअर केले स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारे काही किस्से!

Rajkummar Rao : मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता राजकुमार राव, आज आहे करोडोंचा मालक  

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget