एक्स्प्लोर

20 भारतीय भाषांत गाणी, जादूई सूर, मंत्रमुग्ध आवाज, हॅप्पी बर्थडे लतादीदी !

भारतातील महान गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.

मुंबई: तिच्या सुरांची जादू अशी मोहिनी घालते की काही काळ तरी त्यातून बाहेर निघणं केवळ अशक्य. गाणं म्हणजे लता मंगेशकर, भारतीय रसिक प्रेक्षकांना गाण्याची ही परिभाषा ठाऊक झाली आहे. स्वरसम्राज्ञी या एकाच शब्दांत त्याचं वर्णन होऊ शकतं अशा भारतातील महान गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. 20 भारतीय भाषांत गाणी भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' मिळवणाऱ्या या दुसऱ्या गायिका आहेत.  त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशकं रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या नावाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे.  चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आलं आहे. लतादीदींचा हा सांगितिक ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी समृद्ध आहे. आजवर 20 भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभरातील रसिकांवर या आवाजाची मोहिनी आहे. घरातून संगीताचा वारसा या थोरपणा पेक्षाही त्यांची जनी मानसी प्रतिमा आहे ती दीदी अशीच. लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929ला इंदोरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगितिक वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. दीनानाथांची थिएटर कंपनी होती. ते स्वत:ही उत्तम गायक होते. लतादीदींना वडिलांकडूनच संगीताचं प्रशिक्षण मिळालं. अमान अली खाँ साहेब आणि अमानत खान यांच्याकडेही लतादीदींनी संगीताचे धडे गिरवले. घरातून संगीताचा वारसा आणि गुरुकृपा यामुळे लतादीदींसारख्या हिऱ्याची झळाळी आणखी वाढली. लतादीदी सिनेमात पण 1942मध्ये वडिलांच्या निधनानंतर लतादीदींसाठी गाणं केवळ आवड न राहाता प्रपंचाची निकड बनली.  लतादीदींनी 1942 ते 48 मध्ये हिंदी आणि मराठी अशा आठ सिनेमात काम केलं.  लतादीदींनी काम केलेला पहिला चित्रपट होता नवयुगचा पहिली मंगळागौर हा. याच चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे गाणं गायलं. दीदींची गायनाची औपचारिक सुरुवात झाली ती किती हसाल या 1942 मध्ये आलेल्या चित्रपटाने. अर्थात यातलं दीदींनी गायलेलं गाणं वगळण्यात आलं होतं हा भाग वेगळा. पुढे दीदींनी आप की सेवा में या हिंदी सिनेमासाठी पार्श्वगायन केलं. संगीतकारांनी नाकारलं लतादीदी जेव्हा इंडस्ट्रीत आल्या तेव्हा नूरजहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली अशा पंजाबी आवाजांचं राज्य होतं. अशा काळात आवाज पातळ असं म्हणून संगीतकार त्यांना नाकारत होते.  संगीतकार गुलाम हैदर यांनी सुरुवातीला त्यांना संधी दिली नव्हती. मात्र 1949 मध्ये नियतीने लता मंगेशकर या नावाला एका झंझावाताचं रुप दिलं. बरसात, अंदाज, दुलारी आणि महल या सिनेमांसाठी दीदींनी गायलेली गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे. एस डी बर्मन, ओपी नय्यर, सी रामचंद्र, मदन मोहन अशा अनेक दिग्गज संगीताकारांसोबत लतादीदींनी भारतीय चित्रपटसंगीताचं विश्व गाजवलं. लतादीदींच्या हिंदी आणि मराठी गाण्यांनी भारतीय रसिकांना समृद्ध केलं. लतादीदींनी भारतीय जनमानसाचे कान घडवलेत असंच म्हणावं लागेल. लतादीदींच्या 89व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझाकडून त्यांना अनेक शुभेच्छा. संबंधित बातम्या बर्थ डे स्पेशल : लतादीदींची 'टॉप-10' गाणी 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget