Katrina Kaif Birthday : वयाच्या 14 व्या वर्षी कतरिना कैफने केला हा पराक्रम; रातोरात झाली प्रसिद्ध
बाॅलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री कतरिनाा कैफ तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेली दोन दशके ती चित्रपटसृष्टीत चांगलीच आघाडीवर आहे.
Happy Birthday Katrina Kaif : बाॅलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेली दोन दशके ती चित्रपटसृष्टीत चांगलीच आघाडीवर आहे. स्वबळावर तिने बाॅलीवूडमध्ये (Bollywood) स्वत:चे नाव कमावले आहे.आज सर्वात आघाडीच्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे.आज तिला तिच्या अनेक हिट चित्रपटांकरता ओळखले जाते. तसेच तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी
कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 मधला. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे कश्मिरी वंशाचे ब्रिटिश बिझनेसमन होते; तर आई सुजेन टॉरकेटी या मूळच्या ब्रिटिशच होत्या. कतरिना अगदी लहान असतानाच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला.त्यानंतर ती आणि तिच्या सर्व भावंडांना तिच्या आईने एकटीने सांभाळले. या घटनेनंतर वयाच्या 14 व्या वर्षी कतरिनाने माॅडेलिंग क्षेत्रात काहीतरी करावे असा निर्णय घेतला आणि त्या दिशेने वाटचाल करायला सुरूवात केली.हवाईमध्ये तिनं ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली. त्यानंतर तिनं बऱ्याच सौंदर्य स्पर्धांत भाग घेतला. या यशानंतर तिने काही दिवस लंडनमध्ये फ्रिलान्स माॅडेलिंग देखील केले.
कतरिनाने 2003 मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, मधु सप्रे आणि पद्मा लक्ष्मी हे कलाकार देखील होते. या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफने केली होती. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लाॅप ठरला होता.‘बूम’ चित्रपट फ्लॉप झालेला असला तरी देखील या चित्रपटातील कतरिना कैफच्या बोल्ड स्टाईलने बरीच प्रसिद्धी मिळवली. 'बूम'फ्लाॅप झाल्यानंतर कतरिनाने साऊथकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिने 'मल्लीस्वरी' या तेलगू चित्रपटात काम केले. यानंतर ती बॉलिवूड चित्रपट 'सरकार'मध्ये दिसली. या चित्रपटात कतरिना कैफची छोटी भूमिका होती. कतरिनाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली.यानंतर मात्र तिने परत मागे वळून पाहिले नाही.ती यशाची शिखरे गाठतच राहिली. यानंतर तिने बाॅलीवूडच्या प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले. 2021मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, कतरिना कैफ लवकरच ‘जी ले जरा’ आणि ‘टायगर 3’मध्ये दिसणार आहे.
IMDb वर रेटींग मिळालेल्या कतरिना कैफचे हे आहेत 7 टाॅप चित्रपट
- जिंदगी ना मिलेगी दोबारा
- सरकार
- राजनीति
- नमस्ते लंडन
- वेलकम
- न्युयाॅर्क
- पार्टनर
इतर महत्वाच्या बातम्या
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 'या' पक्षाकडून लढवणार निवडणुक