Katrina Kaif: कतरिना कैफचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग
जाणून घेऊयात कतरिनाचे (Katrina Kaif) IMDb वर सर्वाधिक रेटिंग असणारे चित्रपट...
Katrina Kaif: बॉलिवूडमधील कतरिना कैफ (Katrina Kaif) ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. बूम या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कतरिनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), आणि आमिर खान (Aamir Khan) या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत कतरिनानं काम केलं आहे. नमस्ते लंडन, पार्टनर, रेस, एक था टायगर, धूम 3, बँग बँग या चित्रपटांमधील कतरिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. लवकरच ती मनीष शर्माच्या टायगर 3 या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊयात कतरिनाचे IMDb वर सर्वाधिक रेटिंग असणारे चित्रपट...
IMDb वरील कतरिना कैफचे सर्वाधिक रेटिंग असलेले टॉप 7 चित्रपट
जिंदगी ना मिलेगी दोबारा - 8.2
मल्लीस्वारी - 7.8
सरकार - 7.6
राजनिती - 7.1
नमस्ते लंडन - 7.1
वेलकम - 7.0
न्यू यॉर्क - 6.8
जब तक है जान – 6.7
शर्यत – 6.7
अजब प्रेम की गजब कहानी – 6.4
काही दिवसांपूर्वी कतरिना ही फोन भूत या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता लवकरच तिचा टायगर-3 हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात कतरिनासोबतच अभिनेता सलमान खान देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. कतरिना आणि सलमान यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा लग्न सोहळा पार पडला. कतरिना आणि विकी हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कतरिना आणि विकी यांच्या सोशल मीडियावर फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :