Happy Birthday Kangana Ranaut | कंगना रनौतला वाढदिवसाच्या आधीच मिळालं राष्ट्रीय पुरस्काराचं गिफ्ट
'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगना रनौतहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणौतचा हा चौथा पुरस्कार आहे.
मुंबई : सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 34 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त चाहते कंगनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर कंगना रनौत तिच्या वाढदिवसाच्या आधीच मोठं गिफ्ट मिळालं आहे. एक दिवस आधी झालेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कंगना रनौत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
मागील वर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही आणि कोणता चित्रपटही प्रदर्शित झाला नाही. म्हणून यावर्षी पुरस्कारांची घोषणा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या आधारे केली गेली. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगना रनौतहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणौतचा हा चौथा पुरस्कार आहे.
वाढदिवसाच्या एक दिवस आधी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने कंगना खूप खूश आहे. याबद्दल तिने आभारही मानले आहेत. एका व्हिडिओ पोस्ट करत कंगनाने म्हटलं की, "मला मणिकर्णिका आणि पंगा या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मी मणिकर्णिका सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्युरी टीमचे आभार "
#NationalFilmAwards #NationalAwards2019 #Manikarnika #Panga pic.twitter.com/nNlF7YEa3E
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 22, 2021
चार राष्ट्रीय पुरस्कार विजेती
याआधी कंगना रनौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रकारात तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. 2008 मध्ये आलेल्या 'फॅशन' सिनेमासाठी कंगनाने प्रथम सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या क्वीन चित्रपटातील दमदार अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2015 मध्ये तिला 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
वाढदिवसाच्या दिवशी 'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर लाँच
कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या बहुप्रतिक्षित थलायवी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहे. हा ट्रेलर भव्य सोहळ्याच्या माध्यमातून मुंबई आणि चेन्नईमधून एकाच वेळी लॉन्च होईल. यावेळी कंगना रनौत आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आणि चित्रपटाशी निगडित सर्व अभिनेते आणि टीम उपस्थित राहणार आहेत.
View this post on Instagram
'थलायवी' जयललिता यांच्या संघर्षाची कहाणी
'थलायवी' हा चित्रपट अभिनेत्री ते राजकारणी जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच जयललिता यांचा चित्रपटातील संघर्षाच्या दिवसापासून ते राजकीय यशाचा हा प्रवास चाहते पाहतील.