एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Happy Birthday Ayushmann Khurrana :  अभिनेताच नाही तर, गायक अन् व्हीजेदेखील आहे आयुष्मान खुराना! वाचा अभिनेत्याविषयी खास गोष्टी...

Ayushmann Khurrana Birthday : बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आज (14 सप्टेंबर) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे.

Ayushmann Khurrana Birthday : बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आज (14 सप्टेंबर) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आयुष्मानने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, आयुष्मानने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता. इतकंच नाही तर, वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

अभिनेता आयुष्मान खुराना याचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगडमध्ये झाला. चंदीगडमध्ये शिकत असताना, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी आयुष्मानने टीव्हीवर गायक म्हणून आपली कारकीर्द सुरु करण्याची तयारी केली होती. त्याने 2002 मध्ये चॅनल Vच्या ‘पॉपस्टार्स’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. मात्र, या कार्यक्रमात त्याला फारसे यश मिळाले नाही. मात्र, त्याने आपली मेहनत आणि जिद्द अजिबात सोडली नाही.

खर्च भागवण्यासाठी ट्रेनमध्ये गायली गाणी

2004 मध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एमटीव्हीच्या 'रोडीज' शोमध्ये झळकला होता. या शोचे विजेतेपदही त्याने पटकावले होते. या यशानंतर त्याने अँकरिंगमध्ये पाऊल ठेवले. इथूनच आयुष्मानच्या करिअरची सुरुवात झाली. या संघर्षाच्या काळात स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आयुष्मान चक्क ट्रेनमध्ये गाणी गायचा आणि पैसे मिळवायचा. मेहनतीच्या बळावर आज त्याने बॉलिवूडमध्ये हक्काचे स्थान पटकावले आहे.

आरजे तर अभिनेता...

आयुष्मान खुराना चित्रपटात येण्यापूर्वी रेडिओमध्ये आरजेही म्हणून काम करत होता. त्याआधी, त्याने याचा अभ्यास केला आणि थिएटरमध्ये कठोर परिश्रम केले. त्यानंतर त्याने बिग एफएम रेडिओ चॅनलवर आरजे म्हणून 'बिग चाय: मान ना मान, मैं तेरा आयुष्मान' सारखा सुपरहिट शो केला. आरजे असताना त्याला ‘यंग अचिव्हर्स अवॉर्ड’, ‘भारत निर्माण अवॉर्ड’ मिळाले. यानंतर आयुष्मान व्हीजे म्हणून टीव्हीकडे वळला आणि एमटीव्हीसोबत अनेक शो केले. आयुष्मानने कलर्स वाहिनीच्या रिअॅलिटी शोचे अँकरिंग देखील केले आहे. स्टार प्लसचा शो ‘जस्ट डान्स’मध्ये त्याने सूत्रसंचालन केले.

बॉलिवूडचा दमदार प्रवास

आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) 2012 मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील 'पानी दा रंग' हे गाणेही त्याने गायले होते. चित्रपटासोबतच त्याचे हे गाणेही सुपरहिट झाले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरसह अनेक मोठे पुरस्कार मिळाले. ‘विकी डोनर’नंतर आयुष्मानने ‘नौटंकी साला’ हा चित्रपट केला होता. यानंतर त्याने ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘दम लगा के हैशा’, ‘अंधाधुंद’, ‘अनेक’सारखे हिट चित्रपट केले आहेत.

संबंधित बातम्या

Anek OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आयुष्मान खुरानाचा 'अनेक' नेटफ्लिक्सवर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget