एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Happy Birthday Akshay Kumar : स्ट्रगलर ते बॉलिवूडचा खिलाडी!, अक्षय कुमारचे खास किस्से

अक्षयने सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करुन सुपरस्टार बनलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार पहिल्या पाचमध्ये मोडतो. अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्य, सोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी, या सर्व गोष्टींमुळे अक्षय कुमारने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग तयार केलाय. अक्षय कुमार म्हणजेच राजीव हरी ओम भाटिया. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता.  त्याचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे. अक्षयने सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर रुस्तम, एअरलिफ्ट, रावडी राठोड, वेलकम, ओह माय गॉड, हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अक्षय कुमार आणि त्याचे खास किस्से
  1. राजीव भाटिया ते अक्षय कुमार
बॉलिवूडच्या या खिलाडीला सगळं जग अक्षय कुमार या नावाने जरी ओळखत असलं तरी त्याचं खरं नाव आहे राजीव हरी ओम भाटिया.
  1. अक्षय जेव्हा वेटर म्हणून काम करायचा...
बॉलिवूडमध्ये येण्याआधी अक्षय कुमार बँकॉकमधल्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
  1. जन्म अमृसरचा, नागरीकत्व कॅनडाचं
अक्षय कुमारचा जन्म अमृसरचा असला तरी त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे.
  1. पोर्टफोलिओच्या बदल्यात लाईट बॉय म्हणून काम
मायानगरीत दाखल झाल्यानंतर अक्षयने सुरुवातीला लाईट बॉय म्हणून काम केलं. ज्याच्या बदल्यात त्याला त्याचा पोर्टफोलिओ बनवून मिळाला.
  1. सौगंध' सिनेमापासून फिल्मी आयुष्याची सुरुवात
1991 मध्ये आलेला 'सौगंध' हा अक्षय कुमारच्या कारकीर्दीतला पहिला सिनेमा. राज सिप्पी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
  1. आठ सिनेमांच्या नावात 'खिलाडी'
नावामध्ये खिलाडी असलेल्या आठ फिल्म अक्षयने केल्यात. आणि म्हणूनच तो बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो.
  1. जीवावर बेतलेली 'ती' फाईट
खिलाडीयों को खिलाडी या सिनेमात तो डब्ल्यू डब्ल्यू एफ चॅम्पियन अंडरटेकरसोबत झुंजला. या फाईट सीनदरम्यान त्याला जबरदस्त दुखापत झाली. त्याची पाठ आणि मान जवळपास मोडली होती.
  1. तब्बल 15 वेळा 'विजय' आणि 'राज'
अक्षयने साकारलेल्या भूमिकांमध्ये आठ वेळा त्याचं नाव 'विजय' होतं तर सात वेळा तो 'राज' या नावाने रुपेरी पडद्यावर झळकला.
  1. नामांकनं 13 पुरस्कार मात्र दोनदाच...
फिल्मफेअर पुरस्कारासाठी त्याला आतपर्यंत 13 वेळा नामांकन मिळालं असलं तरी पुरस्कार मात्र केवळ दोनदाच त्याच्या वाट्याला आला आहे.
  1. राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी
2017 मध्ये अक्षयने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवला. 'एअरलिफ्ट' या सिनेमासाठी अक्षयला सन्मानित करण्यात आलं.
  1. 2009 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित
2009 मध्ये अक्षय कुमारला भारत सरकारडून अक्षयला पद्मश्री हा नागरी सन्मान बहाल करण्यात आला.
  1. अक्षयला कॅनडातील विंडसर विद्यापीठाकडून डॉक्टरेट
अक्षयला कॅनडातील विंडसर विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आली. सिनेक्षेत्रातील योगदानासाठी विद्यापीठाने हा गौरव केला.
  1. अक्षय कुमार थाई पदार्थांच्या प्रेमात
सतत जगभ्रमंती करणाऱ्या अक्षयला थाई पदार्थांबद्दल विशेष प्रेम आहे. त्याच्या जेवणात थाई पदार्थांचा आवर्जून समावेश असतो.
  1. शूटिंगदरम्यान शार्क माशासोबत लढाई
अक्षय कुमार हा फक्त अभिनेता नाही तर तो अॅक्शन हिरो आहे. अवघड स्टंट्स स्वत:ला करण्यावर त्याचा भर असतो. अनेकदा ते त्याच्या जीवावरही बेतलं होतं. केपटाऊनमध्ये शूटिंग करताना त्याला शार्क माशाचा सामना करावा लागला. लाईफगार्ड्स वेळीच पोहोचल्यानं गंभीर दुर्घटना टळली.
  1. अभिनेता ते पार्श्वगायक...
निर्माता आणि अभिनेत्याच्या भूमिकेत दिसलेला अक्षय गायक म्हणूनही आपल्या समोर आला. 'स्पेशल छब्बीस' या सिनेमातलं 'मुझ में तू' हे रोमॅण्टिक गाणं त्याने गायलं.
  1. अक्षयचा आवडता सिनेमा 'लाईफ इज ब्युटीफुल'
ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट'लाईफ इज ब्युटीफुल' हा अक्षय कुमारचा सगळ्यात आवडता सिनेमा आहे 16.अभिनेता झालो नसतो तर... मी जर अभिनेता झालो नसतो तरी मी मार्शल आर्ट ट्रेनर असतो, असं अक्षय कुमारने अनेक मुलाखतीतून सांगितलं आहे.
  1. अनुपम खेर यांच्यासोबत हारलेली 'ती' पैज
'स्पेशल छब्बीस' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल यावरुन अक्षय कुमारची अनुपम खेर यांच्यासोबत पैज लागली होती. जी पैज अक्षय हरला. त्याबदल्यात त्याला टेबलवर उभं राहून डान्स करावा लागला.
  1. 'ट्विंकल खन्ना माझ्यासाठी लकी'
ट्विंकल खन्नामुळेच आपलं आयुष्य बदललं असल्याचं अक्षय मानतो. कारण त्यांच्या लग्नाआधी अक्षयचे सलग 14 सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते.
  1. कोट्यवधींच्या लक्झरी कार्सचा ताफा
अक्षयच्या ताफ्यामध्ये अनेक लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये साडे अकरा कोटींची रोल्स रॉइस फॅण्टम, साडेतीन कोटींची बेंटले, पाऊणे दोन कोटींची रेंज रोव्हर अशा अनेक सुपर कार्सचा समावेश आहे.
  1. जॉन अब्राहमकडून 30 लाखांची बाईक गिफ्ट
लक्झरी कार्सप्रमाणेच अक्षय सुपर बाईक्सचाही चाहता आहे. त्यापैकी एक त्याचा मित्र जॉन अब्राहमने गिफ्ट केली आहे. हार्ले डेविड्सन कंपनीची तब्बल 30 लाखांची बाईक जॉनने अक्षयला गिफ्ट केली आहे.
  1. सगळ्या गाड्यांच्या नंबरमध्ये '9' आकडा
अक्षय कुमार त्याच्यासाठी 9 हा आकडा लकी मानतो. त्यामुळे जवळपास सर्वच गाड्यांचा नंबर 909 असा आहे.
  1. सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता
फोर्ब्जने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. अक्षयची 2018 या वर्षातली कमाई होती 444 कोटी रुपये.
  1.  अक्षय 33 व्या क्रमांकावर आहे. भारतातला तो एक मात्र सेलिब्रिटी आहे.
फोर्ब्जच्या यादीत अक्षय कुमार 33व्या स्थानावर जगातल्या सर्वाधिक कमाई असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये
  1. एका सिनेमासाठी तब्बल 54 कोटींचं मानधन?
सध्या अक्षयचा भाव भलताच वधारला असून तो एका सिनेमासाठी तब्बल 54 कोटी रुपये चार्ज करत असल्याची चर्चा आहे.
  1. मिशन मंगलचा ऑस्ट्रेलियामध्ये विक्रम
अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' या सिनेमाने ऑस्ट्रेलियात रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. तिथे 'मिशन मंगल' हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडपट ठरला आहे.
  1. सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर
अक्षय कुमार केवळ अभिनयापुरता मर्यादित अजिबात नाही. अनेक सामाजिक कामांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असतो. मुलींसाठी त्याने मार्शल आर्ट्स ट्रेनिंग स्कूल सुरु केली आहेत. जिथे मुलींना स्वरक्षणाचं पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जातं.
  1. जवानांच्या मदतीसाठी अक्षय कुमारचा उपक्रम
'भारत के वीर' या वेबसाईटच्या माध्यमातून अक्षय कुमार भारतीय जवानांसाठी निधी जमवतो. ज्यातून शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत केली जाते.
  1. मी तुमच्या सोबत आहे... हार मानू नका...
सांगली कोल्हापूरमध्ये महापुराने जो कहर केला तिथेही अक्षय पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेला. मी तुमच्यासोबत आहे. कोणत्याही परिस्थिती हार मानू नका हे त्याचे शब्द अनेकांना धीर देऊन गेले.
  1. वाढदिवसाच्या मुहूर्तावर 'पृथ्वीराज'ची घोषणा
सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी चार सिनेमांवर काम करतोय. आज वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्याने त्याच्या आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा आहे पृथ्वीराज. यशराजची निर्मिती असलेला हा ऐतिहासिकपट पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?Vijay Rupani And Nirmala Sitaraman : विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षकपदी नियुक्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget