एक्स्प्लोर

Khyali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप; गुन्हा दाखल

25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप कॉमेडियन ख्यालीवर (Khyali Saharan) करण्यात आला आहे.

Khyali Saharan : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारनवर (Khyali Saharan) बलात्कार केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच आला आहे. जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप कॉमेडियन ख्यालीवर करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत गुरुवारी (16 मार्च) पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे मंगळवारी (14 मार्च) मानसरोवर पोलीस ठाण्यात ख्याली सहारनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

कॉमेडियन ख्याली हा आपचा कार्यकर्ता आहे. एका महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने मानसरोवर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत "मद्यधुंद अवस्थेत" बलात्कार केला, असा आरोप ख्यालीवर करण्यात आला आहे. मानसरोवर पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक संदीप यादव यांनी सांगितलं की, "तरुणीच्या तक्रारीनंतर ख्यालीविरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सध्या करत आहेत." ही घटना सोमवारी (13 मार्च) घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

श्रीगंगानगर येथील रहिवासी असलेली ही महिला एका फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. साधारण एका महिनाभरापूर्वी ती दुसऱ्या महिलेसोबत कामासाठी मदत मागण्यासाठी ख्यालीच्या संपर्कात आली होती.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी कॉमेडियन ख्यालीने एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. एक स्वत:साठी आणि दुसरी दोन्ही महिलांसाठी. कथितपणे, तेव्हा ख्यालीने बिअर प्यायली आणि महिलांना बिअर पिण्यास भाग पाडले. नंतर एक महिला खोलीतून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला. 

ख्यालीच्या वैयक्तिक आयुष्याचा पक्षाशी संबंध नाही : आम आदमी पक्ष

एका मीडिया रिपोर्टनुसार, आम आदमी प्रवक्ते योगेंद्र गुप्ता म्हणाले की, "आपचे लाखो कार्यकर्ते आहेत आणि त्यापैकी ख्याली आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो ही वेगळी बाब आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही."

ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 चा स्पर्धक

ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 मध्ये ख्यालीने सहभाग घेतला होता. या सीझनचा विजेता रौफ लाल हा ठरला होता. ‘द कपिल शर्मा शो’या शोमध्ये देखील ख्यालीने हजेरी लावली होती. ख्याली हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. त्याला 70.4K एवढे नेटकरी इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.  

View this post on Instagram
 
A post shared by Rajesh Mahiya (@rajesh_mahiya1)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 17 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget