Entertainment News Live Updates 17 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Mukesh Khanna: 'ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून 'वीर चिमाजी आप्पा मार्ग' असं करा; शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची मागणी
Mukesh Khanna : सांस्कृतिक वासरा लाभलेल्या ठाणे (Thane) शहराला अनेक वर्षांचा पुरातन काळाचा इतिहास लाभला आहे. याच ठाणे शहरात इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या तसेच पोर्तुगीजांच्या अनेक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. तर काहींचे अवशेष आजही पाहायला मिळत आहेत. अशातच वीर चिमाजी अप्पा (Veer Chimaji Appa) यांनी देखील सतराशेच्या काळात अनेक लढाया जिंकून ठाण्यातील (Thane News) अनेक गड किल्ले पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडून घेतले आहेत. त्यांचाच पराक्रम सर्वांनाच अविरत राहावा या उद्देशाने ठाण्यातील घोडबंदर रोड (Ghodbunder Road) हे नाव बदलून वीर चिमाजी अप्पा मार्ग असे करण्यात यावे अशी मागणी शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी संग्राम फाऊंडेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) आयुक्त अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांना निवेदन देत केली आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीपच्या आईची होणार एन्ट्री; अतिशा नाईक साकारणार ‘मंगल’ ही भूमिका
Fighter: 'फायटर'मध्ये हृतिक साकारणार 'ही' भूमिका; दीपिकाच्या भूमिकेबाबत सिद्धार्थ आनंद म्हणाला...
Fighter : सिद्धार्थचा आनंदचा फायटर (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ आनंदनं दीपिका आणि हृतिकच्या भूमिकेबाबत माहिती दिली.
हृतिक आणि दीपिका हे फायटर या चित्रपटामध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची भूमिका साकारणार आहेत, असं सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये सांगितलं. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
शिव ठाकरेने घेतली नवी कोरी आलिशान कार; किंमत माहितीये?
Bigg Boss Fame Shiv Thakare Buys A Luxury Car : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव हा अमरावतीचा आहे. बिग बॉस-16 हा शो संपल्यानंतर शिव हा अमरावतीमधील त्याच्या घरी गेला. अमरावतीला गेल्यावर अमरावतीकरांनी शिवचं फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. शिव हा सध्या त्याने खरेदी केलेल्या कारमुळे चर्चेत आहे. शिवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या नव्या गाडीची माहिती चाहत्यांना दिली.
View this post on Instagram
ऑस्कर विजेती गुनीत मोंगा लॉस एंजेलिसहून भारतात परतली; विमानतळावर चाहत्यांनी केलं स्वागत
ऑस्कर विजेती निर्माती गुनीत मोंगा शुक्रवारी ही पहाटे लॉस एंजेलिसहून घरी परतले. गुनीत मोंगाच्या चाहत्यांनी तिचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत केले. नुकताच गुनीत मोंगा हिला तिच्या "द एलिफंट व्हिस्पर्स" (शॉर्ट फिल्म डॉक्यूमेंट्र कॅटेगरी) चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "द एलिफंट व्हिस्पर्स" हा भारतीय निर्मितीसाठी पहिला ऑस्कर आहे. "द एलिफंट व्हिस्परर" हा नेटफ्लिक्सवरील माहितीपट आहे.
View this post on Instagram