एक्स्प्लोर
Advertisement
जीएसटीमुळे देशाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने जीएसटीबाबतचा निर्णय घेताना हजारो कोटींचा महसूल बुडवण्याचा पराक्रम केल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
जीएसटीच्या मंजुरीनंतर 16 सप्टेंबर रोजी केंद्राने काढलेल्या अधिसूचनेद्वारे कलम 17 लागू झालं आहे. पण याच कलमामुळे मुंबई महापालिकेचा जकात गोळा करण्याचा अधिकार रद्द झाला. महाराष्ट्रातील सर्व महापालिकांना 50 कोटींपेक्षा अधिकच्या उलाढालीवरचा एलबीटीही गोळा करता येणार नाही. इचकंच नाही, तर देशातील पेट्रोलियम आणि मद्य सोडून इतर सर्व उत्पादनांवर असणारी एक्साईज ड्यूटी गोळा करता येणार नाही.
या गंभीर चुकीमुळे केंद्र सरकारसमोर आता कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सरकारने ही घोडचूक तातडीने दुरुस्त करुन, वैधानिक परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
शिवाय सध्या मुंबई महापालिकेचे जकात कर आणि इतर महापालिकांनी एलबीटी गोळा करणं तात्काळ बंद करावं. तसंच चार दिवसात गोळा केलेला एलबीटी आणि जकात परत करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement