Govinda OTT App: गोविंदाने लॉन्च केला त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म, 'फिल्मी लट्टू'चं किती रुपयांत मिळणार सब्सक्रिप्शन?
Govinda OTT App: गोविंदाने त्याचे OTT ॲप्लिकेशन लॉन्च केले असून त्याविषयी त्याने स्वत: माहिती दिली.
Govinda OTT App: बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) हा त्याच्या डान्समुळे विशेष ओळखला आहे. त्याच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे आणि तसेच तो प्रेक्षकांचा देखील लाडका अभिनेता आहे. दरम्यान आता गोविंदाने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. अनेक दिवसांपासून गोविंदाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मची चर्चा सुरु होती. पण अखेर त्याने हे प्लॅटफॉर्म सुरु आहे. 'फिल्मी लट्टू' असं या अॅप्लिकेशनचं नाव आहे.
यासंदर्भात गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. तसेच यासाठी किती पैसे मोजावे लागतील याविषयी देखील गोविंदाने माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर गोविंदाच्या या नव्या अॅपची बरीच चर्चा सुरु आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गोविंदाच्या ओटीटी अॅपची चर्चा
गोविंदाने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ओटीटीबद्दल माहिती देण्यात आली आहे. गोविंदाने लिहिले, 'माझा ओटीटी ॲप लट्टू फिल्मी सादर करत आहे. आता डाउनलोड करा. या एंटरटेनमेंट ॲपवर तुम्हाला खूप काही मिळणार आहे आणि गोविंदाने स्वतः याबद्दल सांगितले आहे. आता हे ॲप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला त्यात काय मिळेल ते कळेल. दरम्यान अगदी कमी किंमतीत या अॅप्लिकेशन्सचं सब्सक्रिप्शन उपलब्ध असल्याची माहिती देखील गोविंदाने दिली. त्यामुळे गोविंदाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिनेमा पाहायचा असेल तर त्यासाठी 149 रुपये मोजावे लागणार आहेत.
View this post on Instagram
गोविंदाने 1986 मध्ये इलजाम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने 'लव्ह 86', 'हत्या', 'राजा बाबू', 'शोला और शबनम', 'कुली नंबर 1', 'हीरो नंबर 1', 'आंटी नंबर 1', 'दुल्हे राजा', 'भागम भाग'ने 'स्वर्ग', 'खुद्दार', 'आग', 'हम', 'बनारसी बाबू' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
View this post on Instagram