एक्स्प्लोर

Goshta Eka Paithanichi: मंत्रालयातील महिलांसाठी 'गोष्ट एका पैठणीची'चे स्पेशल स्क्रिनिंग; सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाचा मंत्रालयातील महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोला महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 

Goshta Eka Paithanichi: नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईत काही ठिकाणी स्पर्धांचे, खेळांचे, बाईक रॅलीचे, लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले. या वेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना, खेळातील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर काही ठिकाणी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजनही करण्यात आले. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटाचा मंत्रालयातील महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोला महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ते पुढ म्हणाले, ‘आयुष्याचा अर्थ समजवून सांगणारी 'गोष्ट एका पैठणीची'ची कथा हृदयाला भिडते. सुख कसे शोधावे, हे चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आलंय. सायली संजीवच्या सहजसुंदर अभिनयाने मन जिंकलं.’Goshta Eka Paithanichi: मंत्रालयातील महिलांसाठी 'गोष्ट एका पैठणीची'चे स्पेशल स्क्रिनिंग; सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, 'पैठणी म्हटलं की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आम्ही अनेक खेळांचे, स्पर्धेचे आयोजन केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाला होत्या. या स्पर्धेतील महिलांचा उत्साह खरंच उल्लेखनीय होता. यावेळी अभिनेत्री सायली संजीवनेही या महिलांसोबत धमाल केली. चित्रपटातील इंद्रायणी ही त्यांना आपल्यातीलच एक गृहिणी वाटली. या वेळी अनेकींनी चित्रपट पाहाणार असल्याची इच्छाही व्यक्त केली. हे सगळंच खूप सुखावह आहे. मंत्रालयातील महिलाही कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना सकारात्मक विचार दाखवण्याच्या उद्देशाने, त्यांचे थोडे मनोरंजन करण्याच्या निमित्ताने आम्ही खास शो आयोजित केला आणि मुख्य म्हणजे या शोला आपल्या महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सायलीसोबत महिलांनी हा चित्रपट एन्जॅाय केला.’

मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 7 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaNawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP MajhaBhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेलाPregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत साप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Pankaja Munde Wealth: शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती
शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Embed widget