एक्स्प्लोर

Golden Globe Award : अभिमानास्पद! 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी मतदार म्हणून Narendra Bandabe यांची निवड!

Narendra Bandabe : पत्रकार नरेंद्र बंडबे यांची 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी (Golden Globe Award) मतदार म्हणून निवड झाली आहे.

Golden Globe Award : 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार (Golden Globe Award) हा जगभरातील एक प्रमुख सिनेपुरस्कार सोहळा आहे. आता या जागतिक पातळीवरील पुरस्कारासाठी मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे (Narendra Bandabe) यांची निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील सिनेमांवर मराठीतून लिहिणारे आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी मतदान करणारे ते एकमेव मतदार आहेत. 

'गोल्डन ग्लोब' पुरस्काराचं यंदा 81 वं वर्ष आहे. गेल्यावर्षी या पुरस्कारासाठी मतदार म्हणून जगभरातील 103 पत्रकारांची निवज करण्यात आली होती. यात भारतातल्या मीनाक्षी शेड्डे यांचा समावेश होता. आता यावर्षी नरेंद्र बंडबे यांच्या नावाचा समावेश झाला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Narendra Bandabe (@narendrabandabe)

नरेंद्र बंडबे यांनी आजवर अनेक जागतिक पातळीवरील चित्रपट महोत्सवांत हजेरी लावली आहे. बर्लिन, कार्लोवी वॅरी सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवांतदेखील त्यांनी हजेरी लावली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातदेखील फिप्रेक्सी ज्यूरी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तसेच एबीपी माझासाठी ते नेहमी ब्लॉग लिहित असतात. आजवर जागतिक पातळीवरील वेगवेगळ्या सिनेमांवर त्यांनी लिहिलं आहे.

सिनेसृष्टीतील एक मानाचा पुरस्कार 'गोल्डन ग्लोब' (Golden Globe Award)

'गोल्डन ग्लोब पुरस्कार' (Golden Globe Award) हा 1944 सालापासून 'द हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन' (HFPA) तर्फे देण्यात येतो. या पुरस्कारासाठी जगातल्या 62 देशांमधील मतदार मतदान करतात. सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील मंडळींना हा पुरस्कार देण्यात येतो. ऑस्करप्रमाणेच 'गोल्डन ग्लोब पुरस्कार'देखील सिनेसृष्टीतील एक मानाचा पुरस्कार सोहळा आहे. सिनेविश्वात या पुरस्कार सोहळ्याची चांगलीच क्रेझ आहे. 

'गोल्डन ग्लोब' पुरस्काराच्या नामांकनाची प्रक्रिया जाणून घ्या...

अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मालिकांना 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार दिले जातात. अमेरिकेच्या फिल्म प्रॉडक्शन कंपन्या आपल्या सिनेमांची आणि मालिकांची एन्ट्री 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी पाठवतात. त्यानंतर गोल्डन ग्लोबसाठीचे मतदार सिनेमा आणि मालिकांसदर्भातील वेगवेगळ्या कॅटेगरीबद्दलचं त्यांचं मत नोंदवतात. 1 ते 5 मध्ये त्यांना रेट द्यावं लागतं. त्यानंतर द अर्नेस्ट आणि यंग ही मतं विचारात घेऊन नाकांकनाची अंतिम यादी तयार करतात.

जगभरातील 200 हून अधिक मतदरांमध्ये 52 टक्के महिला मतदार आहेत. कर 51.5 टक्के पुरुष मतदार आहेत. जगभरातल्या 62 देशांमध्ये 43.5 टक्के मतदार युरोपातले आहेत. तर 18.5 टक्के लॅटिन अमेरिका आणि 17 टक्के आशियातले आहेत. यावर्षीच्या 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठीच्या मतदारांचा संख्या 200 हून अधिक झाली आहे. 

संबंधित बातम्या

Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget